आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीपीडितांसाठी आता हेल्पलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - हुंड्यासाठी किंवा इतर कारणांसाठी महिलांचा छळ झाल्याच्या घटना समाजात मोठय़ा प्रमाणात घडतात. परंतु अशा काही घटना पुरुषांबाबतीतही घडत असतात. आता हुंड्यासह अन्य कोणत्या खोट्या प्रकरणात अडकवल्या जाणार्‍या पुरुषांच्या मदतीसाठी राष्ट्रीय पातळीवरील हेल्पलाइनची सुरुवात मध्य प्रदेशात इंदूर येथून झाली आहे. दिल्लीच्या सेव्ह इंडियन फॅमिली (एसआयएफ) या संस्थेने सुरू केलेल्या या हेल्पलाइनचा क्रमांक 08882498498 असा आहे. यावर कॉल करून माहिती दिल्यास पीडित पुरुषाला कायदेशीर सल्ला तसेच व्यक्तिगत मार्गदर्शन केले जाईल. कुणा पुरुषाला हुंडा प्रकरणात फसवण्याची धमकी दिली जाते. अशा व्यक्तीलाही ही संस्था मदत करेल. संस्थेचे दिल्ली येथील प्रतिनिधी अमित लखानी, राजेश गुप्ता यांनी निवृत्त न्यायाधीश के. सी. शर्मा यांच्यासोबत मिळून ही हेल्पलाइन सुरू केली आहे.