आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमामालिनी पोहोचल्‍या जुहूतील घरी; जखमी कुटुंबाला करणार आर्थिक मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राजस्थानात कार अपघातात जखमी झालेल्‍या भाजपा खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांना आज (शनिवारी) रूग्णालयातून सूटी देण्यात आली. अपघातातील जखमी कुटुंबाला आर्थिक मदत करणार असल्याचे हेमामालिनी व त्यांची मुलगी ईशा यांनी सांगितले.

रूग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर हेमा मालिनी आज शनिवारी सकाळी खास चार्टर्ड विमानाने मुंबईत परतल्या. यावेळी मुलगी ईशा आणि जावई भरत तख्तानी त्यांच्यासोबत होते. जुहू येथील हेमा मालिनीच्या घराबाहेर पत्रकारांशी बोलताना इशा म्हणाली, "माझी आई अपघातात जखमी झालेल्या कुटुंबाला मदत करणार आहे. ती नेता म्हणून हे करत नाही, तर ती एक चांगली व्यक्तीही आहे.'

ज्या कुटुंबाने मुलगी गमावली त्याबद्दल वाईट वाटते - ईशा

"अपघातानंतर माझ्या आईची अवस्था बिकट होती. त्यात ती दुसर्‍या कोणाचा विचार कसा करू शकेल. तिच्या जागी कोणीही असते तरी त्‍यांना ते जमले नसते. अपघात झाला त्यावेळी ती झोपलेली होती. शिवाय तिने सर्वांना सीट बेल्टही बांधायला लावले होते. अपघातात ज्या कुटुंबाने आपली मुलगी गमावली त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच वाईट वाटते.' अशी माहितीही इशा देओल यांनी माध्‍यमांना दिली.