आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Car Accident: हेमा मालिनी यांच्यावर शस्त्रक्रिया, वसुंधरा राजेंनी घेतली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार अपघातात जखमी झालेल्या हेमा मालिनी यांची राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. - Divya Marathi
कार अपघातात जखमी झालेल्या हेमा मालिनी यांची राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.
जयपूर - जयपूर -आग्रा मार्गावर अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची मर्सिडीज आणि अल्टो कारची टक्कर झाली होती. कारमधील एका चिमुरडीचा अपघातात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी हेमा मालिनी यांच्या कार ड्रायव्हरला ओव्हर स्पीड ड्रायव्हींग केल्याबद्दल अटक करण्यात आली. दरम्यान राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जाऊन हेमा मालिनी यांची चौकशी केली. त्यासोबतच अल्टोमधील जखमी कुटुंबाचही त्यांनी भेट घेतली.

पोलिसांनी ओव्हरस्पीड ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे.गुरुवारी रात्री अपघातावेळी हेमा यांची मर्सिडिज ताशी 150 किलोमीटर पेक्षा अधिक वेगात असल्याचे समोर आले आहे. या अपघातात अल्टो कारमधील दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. हेमा मालिनी त्यांचा ड्रायव्हर यांच्यासह पाच जण जखमी झाले. जखमीमध्ये मुलीच्या आई -वडिलांचाही समावेश आहे.
नाकाला फ्रॅक्चर, लवकरच मुंबईला परतणार
फोर्टिस हॉस्पिटलचे डॉक्टर पी. ताम्बोळी म्हणाले, हेमा मालिनी यांच्या नाकाला फ्रॅक्चर झाले आहे. गुरुवारी रात्रीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आम्हाला आशा आहे, की त्या लवकरच मुंबईला परत जाऊ शकतील. त्या पूर्ण शुद्धीत असून भेटीला येणाऱ्यांशी संवाद साधत आहेत. डॉ. ताम्बोळी म्हणाले, हेमा यांची जखम भरण्यासाठी साधारण सहा आठवडे लागतील. त्यांच्या सोबतच्या व्यक्तीने एअरबॅग्ज लावलेली असल्याने त्याला जास्त मार लागला नाही.

ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
हेमा मालिनी अपघातानंतर घटनास्थळावरुन दुसऱ्या कारने जयपूरला निघून गेल्या. त्यांनी अल्टो कारमधील जखमींची विचारपूस केली नसल्याचा आरोप होत आहे. ड्रायव्हर महेश ठाकूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इशा देओल पोहचली
हेमा मालिनी यांना उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोके, हात, आणि कमरेला मार लागला आहे. अपघाता निधन झालेल्या चिमुरडीला वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचले असते असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दरम्यान हेमा यांची मुलगी अभिनेत्री इशा देओल शुक्रवारी जयपूरमध्ये पोहोचली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी यांनी देखील हेमा यांची भेट घेऊन चौकशी केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित छायाचित्रे...