आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hema Malini Injured In Car Accident. Latest News In Marathi

\'लवकर उपचार मिळाले असते तर माझी चिन्नी वाचली असती!\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कार अपघातात जखमी झालेली शिखा, इन्सेटमध्ये मृत चिन्नीचा फोटो)

जयपूर- बॉलिवूड अभिनेत्री आणि मथुराच्या भाजपच्या खासदार हेमा मालिनी गुरुवारी रात्री राजस्थानातील दौसा येथे कार अपघातात जखमी झाल्या. हेमा यांची मर्सिडीझ अनियंत्रित होऊन एका अल्टो कारला धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की अल्टोतील दीडवर्षीय मुलीचा मृत्यू झाला. मुलीचे वडील हनुमान, आई शिखा आणि भाऊ शोमिल असे एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

चिन्नी वाचली असती पण...
आमच्या अल्टो कारला हेमा मालिनी यांच्या मर्सिडीझची धडक बसताच चिन्नी कार बाहेर फेकली गेली. ती डोक्यावर आपटली गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दुर्घटनेनंतर तब्बल अर्धातास आम्ही सर्व घटनास्थळीच पडून होतो. माझ्या मुलीवर वेळीच उपचार झाले असते तर कदाचित तिचे प्राण वाचले असते, असे चिन्नीने वडील हनुमान यांनी सांगितले. हेमा मालिनी आणि त्यांचा डायव्हर मात्र आम्हाला जखमी अवस्थेत सोडून तेथून निघून आल्याचा आरोपही हनुमान यांनी केला आहे.

चिन्नी जगात नाही, हे आईला माहीतच नाही!
आपली दीडवर्षीय मुलगी चिन्नी आता या जगात नाही, हे अजून तिची आई शिखाला माहीत नाही. दुर्घटनेनंतर शिखा बेशुद्धच होत्या. शिखा यांच्यावर जयपूर येथील एसएमएस हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. शिखा शुक्रवारी सकाळी शुद्धीवर आल्या. परंतु, चिन्नीचा मृत्यू झाला असल्याची माहिती अद्याप शिखाला दिली नाही. तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला सांगणार असल्याचे हनुमान यांनी सांगितले. शोमिल हा देखील गंभीर जखमी असून त्याच्या उपचार सुरु आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो