आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hemant Soren News In Marathi, Jharkhand Chief Minister, Narendra Modi

मुख्‍यमंत्र्यांची टर उडवणे संघराज्य रचनेवर बलात्कारासारखीच - हेमंत सोरेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/नवी दिल्ली - केंद्र व राज्य सरकारे टीमप्रमाणे काम करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे सांगत असले तरी दुसरीकडे काँग्रेस आणि बिगर भाजप राज्यांचे मुख्यमंत्री सहकार्य करणे तर दूरच, मोदींसोबत उभे राहायलाही तयार नाहीत, अशीच एकंदर परिस्थिती निर्माण झाली आहे.मोदींच्या उपस्थितीत गेल्या पाच दिवसांत तीन मुख्यमंत्र्यांची टर उडवण्यात आली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबाबत गुरूवारी तेच झाले. पंतप्रधान मोदी रांचीतील विद्युत प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी गेले होते.
सोरेन यांच्या भाषणादरम्यान लोकांकडून घोषणाबाजी सुरू असताना मोदी त्यांना शांत बसण्याचे इशारे करत होते. तरीही लोक घोषणा देतच राहिले. व्यासपीठावर सोरेन शांत राहिले खरे पण नंतर त्यांचा संताप बाहेर पडला. पंतप्रधानांच्या उपस्थितीत एका मुख्यमंत्र्यांची ज्या पद्धतीने टर उडवण्यात आली, ती संघराज्य व्यवस्थेवरील बलात्कारासारखीच आहे, असे सोरेन म्हणाले. मुख्यमंत्र्यांची टर हा झारखंडचा अपमान असून त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली नाही तर केंद्राच्या कोणत्याही मंत्र्याला झारखंडमध्ये पाय ठेवू देणार नाही, झारखंड मुक्ती मोर्चा या सोरेन यांच्या पक्षाने म्हटले आहे. ितकडे आम्हीही मोदींच्या सभेत ५०० लोक पाठवून घोषणाबाजी करायला लावली तर भाजप काय करणार? असा सवाल काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी केला त्याचबरोबर तसे करण्याची आपली इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी १२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि १९ ऑगस्ट रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांचीही अशीच टर उडवण्यात आली होती.
या एकूणच प्रकारामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील राज कीय संबंध कधी नव्हे ते ता णले गेले आहेत . केंद्र सरकार वि रूद्ध राज्य सरकार असेच एकंदर चित्र निर्मा ण झाले असून या आधी ते कधीच दिसले नव्हते .

ताकदच दाखवायची असेल तर राजकीय आखाड्यात उतरा
आपण भाजपच्या एखाद्या नेत्याबरोबर नव्हे तर पंतप्रधानांसोबत बसलो होतो. सरकारी कार्यक्रम राजकीय ताकद दाखवण्याची जागा नव्हे. तुम्हाला जर ताकदच दाखवायची असेल तर निवडणुकीच्या आखाड्यात उतरा, आमची तयारी आहे. देशात चुकीचा पायंडा पाडला जात आहे. हे धोक्याचे संकेत आहेत.
- हेमंत सोरेन, झारखंडचे मुख्यमंत्री

पुनरावर्तीच्या भितीने चव्हाणांनी मोदींना टाळले
झारखंड नंतर पंतप्रधान मोदींचा नागपुरात कार्यक्रम होता. नागपुरात मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी करायची होती. त्यांनी तो केलीही. मात्र लोकांकडून टर उडवली जाण्याच्या भितीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमाला आलेच नाहीत. त्यांनी बुधवारीच तशी घोषणा केली होती. शनिवारी मोदींच्या उपस्थितीतील एका कार्यक्रमात त्यांना मध्येच भाषण थांबवावे लागले होते.

मोदींच्या व्यासपीठावर जाणारच : सिध्‍दरामय्या
बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची टर उडवली जात असल्यामुळे काँग्रेसनेही भलेही आपल्या मुख्यमंत्र्यांना मोदींच्या कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला पण कर्नाटकचे मुख्यमंत्री सदि्धरामय्या यांनी मात्र आपण मोदींच्या कार्यक्रमात जाणारच. हा शिष्टाचार आहे आणि त्याचे पालन करणारच असे म्हटले आहे.