आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरो सायकल्सचे माजी अध्यक्ष मुंजाल यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना-उद्योगपती आे. पी. मुंजाल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हीरो सायकल्स व हीरो उद्योग समूहाच्या संस्थापकांपैकी ते एक होते.

डीएमसी हीरो हार्ट सेंटरमध्ये ८७ वर्षीय मुंजाल यांचे निधन झाले. शुक्रवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार होतील. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हीरो समूहातून गेल्या महिन्यातच निवृत्ती स्वीकारली होती. त्यांचे पुत्र पंकज मुंजाल यांनी आता हीरो मोटर्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.
१९४४ मध्ये अमृतसर येथे त्यांनी त्यांच्या ३ भावांच्या मदतीने सायकलचे सुटे भाग तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता. त्यानंतर हीरो नावाची कंपनी त्यांनी लुधियाना येथे स्थापन केली. १९५६ मध्ये सायकल निर्मिती करणारी ती भारतातील पहिली कंपनी होती. ८० च्या दशकात या कंपनीची ख्याती जागतिक स्तरावर गेली. सर्वाधिक सायकल निर्मिती करणारी ती जगातील प्रथम क्रमांकाची कंपनी ठरली.