आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमधून पायी आले, जगाला दुचाकीची सैर: ब्रिजमोहन मुंजाल यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना- जगातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरो ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष ब्रिजमोहनलाल मुंजाल यांचे रविवारी निधन झाले. हीरो मोटोकॉर्पने गेल्या वर्षी ६६ लाख दुचाकी विकल्या. कंपनीचे मार्केट कॅप ५१ हजार कोटींचे आहे.
संपूर्णजगाला दुचाकीवरून फिरवणारे ब्रिजमोहनलाल मुंजाल फाळणीच्या वेळी पाकिस्तानमधून पायी आले होते. त्या वेळी त्यांच्याजवळ फक्त एक बॅग होती. तीत सायकलचे काही सुटे भाग होते. इतर सर्व सामान त्यांनी सीमेपलीकडे सोडले होते. ते चार भावांसह पंजाबच्या टेकचंद जिल्ह्यातील कमालिया भागातून (आता पाकिस्तानमध्ये) अमृतसरला आले होते. सुरुवातीला त्यांनी ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम केले.
१९५४ ला लुधियानात आले आणि सायकल चेन बनवण्याचे काम सुरू केले. दोन वर्षांनंतर पंजाब सरकारने लुधियानात सायकल बनवण्यासाठी १२ लायसन्स देण्याचे टेंडर काढले. मुंजाल यांनी आपले तीन भाऊ सत्यानंद मुंजाल, ओपी आणि दयानंद मुंजाल यांना सोबत घेऊन ते मिळवले आणि ‘हीरो सायकल’ धावू लागली.

हीरोने १९८६ मध्ये जगात सर्वात जास्त सायकली बनवण्याचा गिनीज विक्रम नोंदवला. त्याआधी १९८४ मध्ये जपानच्या होंडा ग्रुपसोबत दुचाकी प्रकल्प सुरू झाला होता. ही भागीदारी २०११ पर्यंत टिकली.

पुढील स्लाइडवर वाचा, सर्वातमोठ्या प्रतिस्पर्ध्याने दिवसांपूर्वीच दिली पावती