आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Alert After Four Iraqi Nationals Went Missing In Bhubaneswar

स्वत:ला इराकी सांगणारे चौघे बेपत्ता; ओडिशामध्ये हायअलर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर- दिल्लीची पासिंग असलेल्या कारमधून आलेले चार जण अचानक बेपत्ता झाल्यामुळे ओडिशामध्ये खळबळ उडाली आहे. चारही जणांनी स्वता:ला इराकी असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर ओडिशामध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. चौघे सोमवारी रात्री उशीरा भुवनेश्वरमधील एका हॉटेलमध्ये आले होते. हॉटेल स्टाफने ओळख पत्र मागितल्यानंतर चौघे तेथून पसार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

कारचे काय झाले?
- राज्याचे डीजीपी के.बी. सिंह यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
- सिंहने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले, की स्वत:ला इराकी सांगणारे चौघे दिल्लीची पासिंग असलेल्या कारमध्ये आले होते. चौकशीत कारचा क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- चौघे सोमवारी रात्री हॉटेल आर्य महलमध्ये पोहोचले होते. स्टाफने त्यांना ओळखपत्रांची मागणी केली असता त्यांनी त्याच्यासोबत हुज्जत घातली व तेथून पसार झाले.
- पोलिस हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत चौघे निघून गेले होते.
- या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ओडिशामध्ये हायअलर्ट घोषित केला आहे. आयजी यांच्या नेतृत्त्वात एक एसआयटी स्थापन करण्‍यात आली आहे. राज्यात नाकाबंदी करण्‍यात आली असून चौघांचा शोध घेतला जात आहे.

काय म्हणाला हॉटेल मॅनेजर?
- आर्य महल हॉटेलचा मॅनेजर शिव नारायण महापात्र याने सांगितले, की, चौघे रात्री उशीरा हॉटेलमध्ये आले. चौघांपैकी एक जण रिसेप्शन डेस्कवर आला. उर्वरित तिघे कारमध्ये बसले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व रेकॉर्ड झाले आहे.
- स्टाफसोबत संशयित हिंदी व इंग्रजी भाषेत बोलत होता.

पोलिस इन्स्पेक्टर हॉटेलमध्ये...
-मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौघे आले तेव्हा एक पोलिस इन्स्पेक्टर हॉटेलमध्ये उपस्थित होता. त्याचे नाव समजू शकले नाही.
- चौघांनी पाच हजार रुपयांमध्ये दोन रुम बुक केल्या होत्या. मात्र, इन्स्पेक्टरने एकाला ओळखपत्र मागताच त्यांनी पळ काढला.
- कारचा क्रमांक DL4C9645 होता. मात्र तो बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, ISIS च्या 30 सपोर्टर्स अटक, फॉरेनर्स व पोलिसांवर होता हल्ल्याचा कट...