आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cyclone Hudhud: Andhra Pradesh Coastal Districts On High Alert, Divya Marathi

आंध्र प्रदेश, बंगालच्या खाडीच्या किना-यावरील जिल्ह्यांत 'हुडहुड'चा हायअलर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - हुडहुड वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता आंध्र प्रदेश व बंगालच्या खाडीच्या किना-यावरील सर्व जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम आणि ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशचे सचीव आय. वाय. कृष्णा राव हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व किनारी भागांतील जिल्हा प्रशासनांच्या संपर्कात आहेत. आपत्तीच्या नुकसानाची तीव्रता कमी करण्यासाठी आंध्र सरकार सज्ज आहे. खुल्या पुनर्वसन कॅम्पची निर्मिती सुरू असून अधिकाधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची व्यवस्था झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ५१ टीम तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, प. बंगाल व बिहारमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. पाच राज्यात बचाव पथकाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हुडहुड हे वादळ "फॅलीन'च्या तुलनेत कमी शक्तीशाली आहे. फॅलीनचा ओडिशाने चांगला मुकाबला केला होता.

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द
आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपला श्रीकाकुलमचा दौरा रद्द केला आहे. श्रीकाकुलम येथील शासकीय कर्मचा-यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. १३ ऑक्टोबरच्या फायलिन चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान श्रीकाकुलम जिल्ह्याचेच झाले होते.

वादळाला पक्ष्याचे नाव
हुडहुड हे वादळाचे नाव काहीसे विचित्र वाटते. इस्रायलच्या राष्ट्रीय पक्ष्याच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. ओमान देशाने नावासंदर्भातील प्रस्ताव पाठवला होता. सुतार पक्ष्यासारखा दिसणारा आणि अतिशय रंगीत असलेला हा पक्षी आफ्रिका-युरोपात आढळून येतो.

आठ देशांचा प्रस्ताव
भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड यांच्याकडून चक्रीवादळाला नाव देण्यासंदर्भातील आपापले प्रस्ताव मांडले होते. ओमानचा सल्ला स्वीकारण्यात आला. सर्व देशांतील हवामान विभागांकडून नावांचा सल्ला दिला जातो. सहभागी देशांकडून आलेली नावे एकानंतर एक या पद्धतीने दिली जातात. आता भविष्यातील वादळाला पाकिस्तानने सुचवलेले नाव (निलोफर) दिले जाईल. त्यानंतर प्रिया (श्रीलंका), कोमेन (थायलंड) अशी यादी आहे. भारताचे लेहर अगोदर येऊन गेले आहे.

* इतर आपत्ती निवारण व्यवस्था
१६२ जहाजे मदतीसाठी तैनात
५४ डायव्हिंग सेट