आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमडीएमकेला झटका, एलटीटीईवरील बंदी उच्च न्यायालयात कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम (एलटीटीई) संघटनेवर केंद्र सरकारने 2010 मध्ये घातलेली बंदी मद्रास उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्या. इलिप धर्मा राव आणि एम. वेणुगोपाल यांनी एमडीएमके नेते वायको आणि प्रिझनर्स राइट फोरमने दाखल केलेली याचिका फेटाळली. प्रतिबंधित कारवाई लवादाच्या नोव्हेंबर 2010 च्या आदेशाला याचिकेतून आव्हान देण्यात आले होते. एलटीटीईवरील बंदीची अधिसूचना 14 मे 2010 रोजी जारी करण्यात आली होती.