आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • High Court Lucknow Bench Asked Answer Election Commision Love Jihad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘लव्ह जिहाद’ शब्दावर बंदी घालण्याची मागणी; योगी म्हणाले, बोलतच राहाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - ‘लव्हजिहाद’ या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. ‘लव्ह जिहाद’च्या नावावर जातीय तणाव पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा शब्द वापरण्यास बंदी घालावी, तसेच योगी आदित्यनाथ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली असून दहा दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ सप्टेंबरला होणार आहे.

पंकज तिवारी या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इम्तियाज मुर्तजा, अश्विनीकुमार सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेत तिवारी यांनी म्हटले आहे की, ‘लव्ह जिहाद’च्या नावावर राज्यात राजकीय पक्ष, संघटनांकडून जातीय तणाव पसरवला जात आहे. त्यामुळे हा शब्द कुणाला वापरू देऊ नये. त्याचबरोबर केंद्रीयमंत्री कलराज मिश्र यांना उत्तर प्रदेशात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्यापासून रोखण्यात यावे, अशीही मागणी उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांवर पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

गृहमंत्रालय करणार प्रकरणांचा अभ्यास
नवी दिल्ली - उत्तरप्रदेश, झारखंडसह देशातील विविध राज्यांत घडणाऱ्या कथित ‘लव्ह जिहाद’प्रकरणांचा केंद्रीय गृहमंत्रालय अभ्यास करत आहे. ‘लव्ह जिहाद’ त्यामुळे पसरू पाहणारा हिंसाचाराच्या प्रत्येक घटनांची नोंद गृहमंत्रालयाकडून घेतली जात असून त्यावर एक सविस्तर अहवाल तयार केला जात आहे. यासंदर्भात सर्व राज्यांकडे पूरक माहिती मुद्दे मागवण्यात आले आहेत. भाजप हिंदुत्वावादी संघटनांनी ‘लव्ह जिहाद' विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. तर यामुद्यावर धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवू पाहत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याला राजकीय रंग देण्याचा प्रकार होत असल्याने गृहमंत्रालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. रांचीमधील तारा शाहदेव धर्मांतर प्रकरण, मेरठमधील धर्मांतराची घटना तसेच उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यांत झालेल्या जातीय दंग्यांबाबतही गृहमंत्रालयाने स्वतंत्र अहवाला मागितला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
पुढील स्लाइडमध्ये, ‘लव्ह जिहाद’वर बोलत राहणार : आदित्यनाथ