आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवंत पेटवून घेणाऱ्या मुलीची वहिणी म्हणाली, माझ्या पती आणि नणंदमध्ये होते अनैतिक संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - शेतातील बांध उद्ध्वस्त केल्यानंतर जीवंत पेटवून घेणारी तरुणी ललिता प्रकरणात हायकोर्टाने निःपक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत. यात मृत्यूमुखी पडलेल्या ललिता हिच्या वहिणी वंदनाने चक्क भाऊ-बहिणीतच अनैतिक संबंध असल्याचा गंभीर आरोप लावला आहे. वंदनाने या प्रकरणी पोलिस आयुक्तालयात महिला पोलिस ठाण्यात आपल्या पती आणि नणंद विरोधात तक्रार दाखल केली आहे. 
 
राजकारणाचे आरोप 
- या प्रकरणात आरोपी सरपंच रणवीर सिंह आणि श्रवण सिंह यांनी तहसिलदार आणि अतिरिक्त पोलिस महाधीक्षकांच्या अहवालानुसार आपण दोषी ठरत नसल्याचा युक्तीवाद कोर्टात मांडला आहे. संपूर्ण प्रकरण राजकीय असून यासंदर्भातील पुराव्यांवर पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे. 
- याच प्रकरणी जीवंत पेटवून घेऊन मृत्यूमुखी पडलेल्या ललिता हिच्या वहिणी वंदनाने दावा केला की तिने आपल्या पती आणि नणंदेला नको त्या परिस्थितीत पाहिले आहे. यावर संतप्त पती विद्याधर आणि नणंदने आपल्याला मारण्याचाही प्रयत्न केला. ललिताने पेटवून घेतले त्याच्या काही दिवसांपूर्वीच आपल्याला घरातून बाहेर काढण्यात आले होते. या घटनेतील नणंद गायब असून महिला पोलिस तिचा कसून शोध घेत आहेत. 
 
पुलिसांच्या रिपोर्टमध्ये काय?
- ललिताचा भाऊ विद्याधरची पत्नी वंदना हिने 22 मे रोजी आपला पती मारहाण करत असल्याची तक्रार दाखल केली होती. पती विद्याधर आणि नणंदमध्ये अनैतिक संबंध होते. भाऊ-बहिणीला नको त्या अवस्थेत आपण प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा तिने केला आहे. 
- तिने हा प्रकार पाहिल्याचे लक्षात आल्यानंतर भाऊ-बहिणीने कथितरीदत्या मारहाण सुरू केली. आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. सासरच्या मंडळीला हा प्रकार सांगितला तेव्हा त्यांनीही मला शांत बसण्यासाठी धमकावले. यानंतर आपले नातेवाईक आले असताना सासरच्या मंडळींना सुरक्षेचे आश्वासन दिले. आणि काही दिवसांनंतर पुन्हा घराबाहेर काढले. 
बातम्या आणखी आहेत...