आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमध्ये ईव्हीएम सील करण्याचे हायकोर्टाचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
नैनिताल- उत्तराखंडच्या विकासनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) सील करण्याचे आदेश येथील उच्च न्यायालयाने दिले आहेत. आता ही यंत्रे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवली जाणार आहेत. विकासनगरमध्ये पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार नवप्रभात यांनी ईव्हीएममध्ये हेरफेर करण्यात आल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून न्यायालयाने हे आदेश जारी केले. विकासनगरमधून विजयी भाजपच्या उमेदवारालाही नोटीस दिली. 
बातम्या आणखी आहेत...