आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन भावांना अॅसिडने घातली होती अंघोळ, हायकोर्टाने शहाबुद्दीनची जन्मठेपेची शिक्षा केली कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिवान अॅसिड हल्ल्यातील मुख्य आरोपी शहाबुद्दीनला पाटणा हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा कायम केली आहे. - Divya Marathi
सिवान अॅसिड हल्ल्यातील मुख्य आरोपी शहाबुद्दीनला पाटणा हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा कायम केली आहे.
पाटणा - सिवान अॅसिड अटॅक प्रकरणात पाटणा हायकोर्टाने शहाबुद्दीनला जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. शहाबुद्दीन सध्या दिल्लीतील तिहार जेलमध्ये आहे. या प्रकरणात शहाबुद्दीनसह आणखी तीन जण दोषी आहेत. मालमत्तेच्या वादावरुन शहाबुद्दीनने सीवानच्या सतीश आणि गिरीश या दोन भावांना अॅसिडने अंघोळ घालून ठार मारले होते. 
 
2015 मध्ये विशेष न्यायालयाने सुनावील होती शिक्षा 
- शहाबुद्दीनने सिवान विशेष न्यायालयाच्या निर्णयाला पाटणा हायकोर्टात आव्हान दिले होते. 
- हायकोर्टाने शहाबुद्दीनच्या आव्हान याचिकेवर सुनावणी करुन 30 जून 2017 रोजी निर्णय राखून ठेवला होता. 
- सिवान विशेष न्यायालयाने 11 सप्टेंबर 2015 रोजी शहाबुद्दीनसह त्याचे साथीदार राजकुमार साह, मुन्ना मियां उर्फ शेख अस्लम यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 

काय आहे प्रकरण 
- 16 ऑगस्ट 2004 ला चंदा बाबू त्यांच्या भूखंडाचा वाद घेऊन पंचायतीत गेले होते. तेव्हाच बाहेरुन आलेल्या काही लोकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. वाद वाढला आणि त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. 
- चंदा बाबू यांची मुले आणि नातेवाईक घरी पळून गेले. त्यांनी घरात असलेले अॅसिड हल्लेखोरांवर फेकले. 
- आरोप आहे की त्याच दिवशी शहरातील दोन वेगवेगळ्या दुकानांतून चंद्रकेश्वर प्रसाद उर्फ चंदा बाबू यांची दोन्ही मुले गिरीश उर्फ निक्कू आणि सतीश उर्फ सोनू यांचे अपहरण करण्यात आले आणि अॅसिडने अंघोळ घालून त्यांची हत्या करण्यात आली. 
- सतीश आणि गिरीशच्या हत्येचा आरोप शहाबुद्दीन आणि त्याच्या गुंडावर ठेवण्यात आला. 
- सतीश आणि गिरीश यांचे वडील चंद्रकेश्वर प्रसाद यांनी सिवान विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर म्हटले होते, 'शहाबुद्दीनची नजर माझ्या प्रॉपर्टीवर होती. त्याची किंमत मी माझ्या मुलांच्या प्राणाने चुकवली आहे. माझा तीन-तीन वेळा खून झाला आहे.'
 
असा झाला शहाबुद्दीनचा 'साहेब'
देशातील गुन्हेगारीच्या राजकारणाच्या निवडक उदाहरणांमध्ये शहाबुद्दीनचे नाव सर्वात वर असावे. 1990 च्या सुरुवातीस बिहारमध्ये एक नाव वेगाने पुढे आले. शहाबुद्दीन पाहता-पाहता आमदार झाला. जिरादेई हा त्याचा मतदारसंघ. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे हे गृहक्षेत्र. 1990 मध्ये बिहारमध्ये राजकारणाचा दुसरा अध्याय सुरू झाला. लालुप्रसाद मुख्यमंत्री होते. शहाबुद्दीनची गरज राजकीय पक्षालाही भासू लागली. लालूंनी त्याला जनता दलाचे तिकीट दिले आणि शहाबुद्दीन आमदार झाला. 1996 मध्ये तो खासदार झाला आणि नंतर "साहेब'.

सिवानमधील प्रत्येक निर्णय साहेबाच्या संमतीशिवाय होत नसे. वडिलांचे मूळ गाव प्रतापपूरमध्ये दरबार सुरू झाला. हळूहळू समांतर सत्ता सुरू झाली. शहाबुद्दीनचा स्वीय सहायक राहिलेल्या श्रीकांत भारतीने त्याची साथ सोडली. म्हणजे साहेबाशी उघड बंडखोरी. सवर्ण व्यावसायिक श्रीकांतने आपल्या समाजाची मते ओमप्रकाश यादवच्या पारड्यात दिल्याचे मानण्यात आले. यानंतर काही दिवसांत यादवना मारण्यात आले. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष राहिलेल्या चंद्रशेखरची हत्या देशासाठी मोठी बातमी होती. या बातमीतून शहाबुद्दीनचे नाव राष्ट्रीय स्तरावर चर्चिले गेले. 2001 मध्ये शहाबुद्दीनचा निकटवर्तीय आणि राजदचे स्थानिक नेते मनोज कुमार पप्पूविरुद्ध वॉरंट घेऊन आलेल्या पोलिसांना शहाबुद्दीनचा मार खावा लागला होता. त्यामुळे पोलिसांना आल्या पावली परत जावे लागले होते. यानंतर पोलिसांनी शहाबुद्दीनविरुद्ध आघाडी उघडली. सिवान पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गोळीबार केला. दोन्ही बाजूंच्या गोळीबारात दोन पोलिसांसह आठ जण ठार झाले. मृतदेहाजवळ एके-47 आणि अन्य घातक शस्त्र पडले होते, मात्र शहाबुद्दीने त्यास हात लावला नाही. सिवानचे तत्कालीन एसपी एस. के. सिंघल यांच्यावर एके-47 बंदुकीने गोळीबार केल्याची चर्चा सिवानमध्ये ऐकली जाते.

शहाबुद्दीनवर 2005 मध्ये बिहारमधील राष्ट्रपती राजवटीदरम्यान नियंत्रण आणण्याचा प्रयत्न झाला होता. एसपी रत्न संजय आणि जिल्हाधिकारी सी. के. अनिल यांनी प्रतापपूरमध्ये त्याचे घर 'व्हाइट हाऊस'वर धाड टाकली होती. शहाबुद्दीनच्या तळघरात शस्त्रास्त्रे भांडार असल्याचे कारण पोलिसांनी दिले होते. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. हरणाचे कातडे, पाकिस्तानी बनावटीचे शस्त्रे आणि नाइट व्हिजन गॉगल्स मिळाले होते. बिहारमध्ये लालूंचे सरकार नव्हते हे त्यामागचे कारण. नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आणि शहाबुद्दीनच्या वाईट दिवसांना सुरुवात झाली होती. 
बातम्या आणखी आहेत...