आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामला हायकोर्टाचा झटका, जामीनासह दोन्ही याचिका फेटाळल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपुर - अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून तुरुंगात कैदेत असलेल्या आसारामला मंगळवारी राजस्थान हायकोर्टाकडून दुहेरी धक्का मिळाला. आसारामच्या दोन याचिका हायकोर्टाने फेटाळून लावल्या. त्यापैकी पहिल्या याचिकेत आसारामच्या वकिलांनी संबंधित मुलगी ही अल्पवयीन नसल्याचे म्हटले होते.
त्यामुळे बाल लैंगिक शोषण कायद्याची कलमे रद्द करून जामीन देण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर दुसऱ्या याचिकेत या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार एस.आय नितिन देव यांची नव्याने साक्ष घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या. त्यामुळे आसारामच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मंगळवारी या प्रकरणात न्यायाधीश विजय विश्नोई यांच्या न्यायालयात या प्रकरणी महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

दहावीचे मार्कशीट महत्त्वाचे
जिल्हा न्यायालयाने सरकारी पक्षाचा अर्ज स्वीकारल्याने आसाराम यांच्या वकिलांनी त्याला हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यानंतर जस्टिस विश्नोई यांनी दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिका फेटाळल्या. सरकारी पक्षाला संबंधित मुलीचे दहावीचे मार्कशीट सादर करता आले नाही, हे हायकोर्टाने मान्य केले. अशा प्रकारच्या खटल्यात ते अत्यंत गरजेचे असते, असेही कोर्टाने नमूद केले आहे. त्याचवेळी हायकोर्टाने निर्णय कायम ठेवत सरकारी पक्षाला दिलासाही दिला आहे.

जामीनाची होती आशा
काही दिवसांपूर्वीच हिट अँड रन प्रकरणामध्ये सलमान खानला जामीन मिळाला होता. त्यामुळे आसारामलाही यावेळी कोर्टाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मला तर शिक्षाही झालेली नाही, त्यामुले जामीन मिळण्याची आशा असल्याचे आसाराम कोर्ट परिसरात म्हणाले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विहिंप नेते अशोक सिंघल आणि भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांची न्यायालयात भेट घेतली होती.
बातम्या आणखी आहेत...