आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • High Court Rejects Permission To 84 Kosi Parikrama

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

84 कोसी परिक्रमेला परवानगी नाहीच, विहींपचे शेकडो कार्यकर्ते अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्‍या/लखनौ- विश्‍व हिंदू परिषदेच्‍या 84 कोसी यात्रेवरील बंदी उठविण्‍यास अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने नकार दिला आहे. बंदीविरोधा दाखल करण्‍यात आलेली याचिका न्‍यायालयाने फेटाळली. ही यात्रा 80 वर्षांपासून आयोजित करण्‍यात येत आहे. मात्र, न्‍यायालयाने त्‍यास परवानगी दिली नाही. दरम्‍यान, यात्रेसाठी अयोध्‍येला जाणा-या 250 पेक्षा जास्‍त विहिंपच्‍या कार्यकर्त्‍यांना अटक करण्‍यात आली आहे. यात्रेवरुन सुरु असलेल्‍या वादामुळे अयोध्‍येला छावणीचेच स्‍वरुप प्राप्‍त झाले आहे.

विश्व हिंदू परिषदेने देखील कोसी परिक्रमेच्या कार्यक्रमात काहीही बदल करणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्‍यामुळे अयोध्‍येत तणावाचे वातावरण आहे. यात्रा रोखण्‍यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी बॅरीकेटींग सुरु केले आहे. शहरातील पूल आणि फैजाबाद बायपासवर बॅरीकेट्स लावण्‍यात आले असून कडक बंदोबस्‍त लावण्‍यात आला आहे. अयोध्येहून 25 ऑगस्टला ही यात्रा सुरू होईल. सरकारने ज्या विहिंप नेत्यांविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. त्यात अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया, रामविलास वेदांती यांचा समावेश आहे