आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • High Level Security For CBI Judge Jagdeep Alongwith Family | Updates In Dera Verdict

राम रहीमला शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत 60 जवान, बुलेटप्रुफ कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगदीप सिंह यांनी बाबा राम रहीम याला 2 साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. - Divya Marathi
जगदीप सिंह यांनी बाबा राम रहीम याला 2 साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
पंचकूला- डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याला शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची बुलेटप्रूफ गाडी देण्यात आली आहे. पंचकूलाच्या स्पेशल सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांच्या सुरक्षेत 60 जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या घरालगत 3 चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. जगदीप सिंह यांनी बलात्कारी राम रहीमला साध्वींवर बलात्काराच्या आरोपाखाली 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या राम रहीम हा सुनारिया तुरुंगात सजा भागत आहे. 
 
कोर्टाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेतही वाढ
- न्यायाधीश जगदीप सिंह यांच्या सुरक्षेत असणाऱ्या जवानांच्या टीमचे नेतृत्व डीएसपी राजेश फोगाट आणि पोलिस निरीक्षक जंगशेर सिंह हे करत आहेत.
- सध्या न्यायाधीशासोबत 4 ते 5 गाडया असतात. सीबीआयच्या कोर्टाबाहेरही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. CBI चे वकील एचपीएस वर्मा यांचीही सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. 
 
डेरा प्रवक्त्याच्या मेहुण्यासह तिघांना अटक
- पंचकूलाचे डीसीपी मनबीर सिंह यांनी सांगितले की, राजस्थान येथील उदयपूर येथून प्रदीप गोयल इन्सान याला अटक करण्यात आली आहे. तो हरियाणाचा राहणारा आहे. पोलिस त्याला पंचकूला येथे घेऊन गेले आहेत. पिंजौर येथून विजयला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरही पंचकूला येथे हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप आहे. 
- रविवारी पोलिसांनी मोहाली येथून प्रकाश उर्फ विक्की नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर हिंसाचार भडकवल्याचा आणि देशद्रोहाचा आरोप आहे. तो डेऱ्याच्या प्रवक्ता आदित्य इन्सान याचा मेव्हणा आहे.
 
राजस्थानहून 15 ते 20 बस भरून पंचकूला गेला होता प्रदीप
- पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप निकालाच्या दिवशी राजस्थानहून 15 ते 20 बस भरून पंचकूला येथे गेला होता. त्याने आदिवासी भागातून माणसे गोळा केली. त्याने त्यांना पैशाचे प्रलोभन दाखवले. प्रत्येकाला 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. दंगल घडवून आणण्यासाठी 2 ते 3 दिवस अगोदरच राजस्थानहून हरियाणाला या 15 ते 20 बसमधुन लोकांना नेण्यात आले होते. 
 
आणखी 2 खून प्रकरणांवर सुनावणी
- पंचकूला येथील कोर्टात शनिवारी राम रहीम विरोधात डेऱ्याचा सदस्य रणजीत सिंह आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांचा खून केल्याप्रकरणी सुनावणी झाली.
- सुनावणी दरम्यान सीबीआय कोर्टाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. ते प्रत्येक वाहनाची तपासणी करत होते. कोर्टापर्यंत केवळ वकिलांना आणि या प्रकरणाशी संबंधित लोकांनाच जाऊ देण्यात आले. 
 
ड्रायव्हर खट्टा सिंह जबाब देणार
- राम रहीमचा ड्रायव्हर खट्टा सिंह याने सांगितले की तो बाबाच्या विरोधात जबाब देणार आहे. खट्टा 2012 मध्ये आपल्या जबाबापासून उलटला होता.
- खट्टा सिंह याने सांगितले की, 2012 मध्ये आपण घाबरुन जबाबापासून उलटलो होतो. राम रहीमचे गुंड माझ्या मुलाला मारु शकत होते. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. बाबाचे कारनामे पहिल्यांदा आणि नंतर बाहेर सगळ्यांना सांगेल. मी कोर्टात जबाब देण्यासाठी अर्ज दिला आहे.
 
राम रहीमला काय झाली सजा? काय आहे प्रकरण?
- बलात्काराच्या 2 प्रकरणात डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 28 ऑगस्ट रोजी 10-10 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने राम रहीमला 30 लाखाचा दंडही ठोठावला आहे. यात 15-15 लाखाचा दंड 2 बलात्कारासाठी आहे. यातील 14-14 लाख रुपये 2 साध्वींना देण्यात येतील.
 
हिंसाचारात झाला होता 38 लोकांचा मृत्यू
- 25 ऑगस्ट रोजी सीबीआय कोर्टाने पंचकूला येथे डेरा प्रमुखाला 2 बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. त्याला दोषी ठरविल्यानंतर त्याचे समर्थक भडकले. त्यांनी पंजाब आणि हरियाणा या राज्यात पंचकूला, सिरसा, कैथल, फतेहाबाद आणि पानिपत या ठिकाणी हिंसाचार केला. तोडफोड करतानाच अनेक ठिकाणी त्यांनी आग लावली. या घटनांमध्ये 38 लोकांचा मृत्यू झाला. तर 264 लोक जखमी झाले. हिंसाचारानंतर पोलिेसांनी 926 लोकांना अटक केली आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती 
बातम्या आणखी आहेत...