आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7.5 कोटींची नोकरी सोडून झाल्या साध्वी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/पारसनाथ - साध्वी बनण्यासाठी निशा कपासी यांनी न्यूयॉर्कमधील फॅशन डिझायनरची नोकरी सोडली आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न साडेसात कोटी रुपये होते.
> २७ वर्षीय निशा यांना ऐहिक जीवनात रस उरला नाही. आजवर दागिने, महागडे ड्रेस घालणा-या निशा रविवारी जैन साध्वीच्या रूपात दिसतील. त्यांचे वडील न्यूयाॅर्कमध्ये कोच फॅक्टरीचे मालक आहेत. त्यांनी निशाला साध्वी होण्यासाठी होकार दिला. आचार्य कीर्तियश सुरीश्वरजी महाराज यांच्या सान्निध्यात हा विधी होणार आहे.

सर्व कमाई दान केली
जैन धर्माच्या परंपरेनुसार शनिवारी निशा कपासी यांची वर्षी-दान यात्रा काढण्यात आली. या वेळी त्यांनी आपली सर्व कमाई गरजूंना मुक्तहस्ताने दान केली.