आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित सवर्णांचा वाद, पोलिसांनी हेल्मेट घालून काढली नवरदेवाची वरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्मेट घालून वरातीत मिरवणारा नवरदेव. - Divya Marathi
हेल्मेट घालून वरातीत मिरवणारा नवरदेव.
रतलाम - मध्यप्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात एक दलित मुलगा घोडीवर बसून लग्नासाठी निघाला तेव्हा गावातील सवर्णांनी त्याच्यावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी नवरदेवाला इजा होऊ नये म्हणून चक्क हेल्मेट घालून त्याच्या लग्नाची वरात काढली. नवरदेवाला हेल्मेट घालण्याशिवाय पोलिसांना परिसरातील घरांवर नजरही ठेवली. तसेेच पोलिसांसह प्रशासकीय अधिकारीही वरातीत सहभागी झाले होते.

काय आहे प्रकरण?
रतलामच्या नेगरून गावात रविवारी रात्री एका दलित कुटुंबाच्या घरी विवाहसोहळा होता. त्यावेळी शेजारच्या गावातून व-हाड आलेले होते. रात्री आठच्या सुमारास नवरदेव मिरवायला निघाला. पण त्याचवेळी आजुबाजुच्या घरांमधून वरातीवर दगड फेकण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वरात थांबवण्यात आली. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नवरदेवाला चक्क हेल्मेट घातले. दगडाने त्याच्या डोक्याला जखमा होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. दरम्यान परिसरांतील घरांच्या छतावर पोलिस पहारादेखिल देत होते.

मुलीच्या वडिलांना सवर्णांकडून असा प्रकार होणार याची आधीच जाणीव होती, असे सांगितले जाते. त्यामुळेच त्याने पाच दिवसांपूर्वीच पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. यामागचे कारण म्हणजे येथील सवर्ण वर्गातील लोकांना दलित समुदायाच्या नवरदेवाने घोडीवर बसून मिरवणे आवडत नाही. याप्रकारचे आणखी एक प्रकरण समोर आले होते, पण पोलिसांच्या बंदोबस्तात तो विवाह सोहळा संपन्न झाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा. संबंधित PHOTO