आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात: 120च्या स्पीडमध्ये चालवत होते कार, या अवस्थेत आढळले 4 मित्रांचे मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - ऐन दिवाळीच्या दिवशीच एका अपघातात चार मित्रांचा मृत्यू झाला. आता या अपघाताचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात ते गाडीला 120च्या स्पीडने पळवताना दिसताहेत. व्हिडिओ अपघाताच्या काही वेळ आधीचा असल्याचे सांगितले जात आहे.
 
कसा झाला भीषण अपघात?
- दिवाळीच्या रात्री फिरायला गेलेल्या एकूण 8 मित्रांपैकी 4 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. चौघेही गाडीत पुढच्या सीटवर बसलेले होते.
- जो व्हिडिओ समोर आला आहे त्यात दिसतेय की, कशाप्रकारे गाडीचा वेग वाढतच गेला. 80, 90, 100 आणि मग 120 Km/Hr च्या स्पीडने कार चालवण्यात आली. या वेगाने 4 मित्रांचा जीव घेतला.
- पोलिसांनुसार एक कार उदयपूरहून डुंगरपूरला जात होती. कारमध्ये आठ जण स्वार होते. सोमकागदर गावाजवळ एक ट्रक कारच्या पुढे चालत होता. अचानक कार अनियंत्रित झाली आणि वेगाने ट्रकमध्ये शिरली. दुर्घटना एवढी भयावह होती की पुढच्या सीटवर बसलेल्या तीन जणांचे अक्षरश: तुकडे होऊन ते कारमध्ये फसले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
मृत मित्रांची नावे
- कारमध्ये स्वार महिपाल सिंह रा. डुंगरपूर, चंद्रवीर सिंह रा. गामडी हाडा, दिग्विजय सिंह रा. मांडवा आणि ललित तांबोळी रा. डुंगरपूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सर्व मृत आणि जखमींचे वय 20 ते 25 वर्षे होते.
 
हे झाले जखमी
- या अपघातात गोकुल यशवंत सोनी, लेखक ऊर्फ हॅपी सनील भाटिजा, प्रकाश सिंधी, कपिल सिंधी हे जखमी झाले आहेत.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...