आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांची सानवी, वजन 30 किलो ; आहार मात्र मोठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतियाळा - वय अवघे तीन वर्षे. वयापेक्षा दहापट म्हणजे 30 किलो वजन. या मुलीचा आहार ऐकाल तर थक्क व्हाल. सकाळी उठताच दोन - तीन ग्लास दूध किंवा ज्यूस, दिवसभर आणखी बरेच काही खाणे सुरूच असते. ही माहिती आहे लालबाग येथील सानवी कश्यपची. आहार व खाण्या - पिण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सानवीला ‘हेल्दी बेबी’ असे टोपण नाव मिळाले आहे. सानवीची आई श्वेता यांनी सांगितले की, मुलीला दुपारी डाळ - भात हवा असतो. सायंकाळी पपई, अंगूर, केळी व काजू खाण्याची सवय आहे. रात्री पुन्हा दूध - चपाती तिला द्यावी लागते. आठवड्यातून तीन दिवस मॅगी, हलवा किंवा इतर पदार्थ मागते. जेव्हा ती समस्तीपूरला (बिहार) असते तेव्हा ती दिवसभरात 4 - 5 लिटर दूध पिते. शिवाय तिला नाष्ट्यामध्ये ब्रेडसोबत 200 ग्रॅम लोणी लागते.
ईटिंग डिसऑर्डर की आणखी काही? : राजिंदरा रुग्णालयाचे बालचिकित्सक डॉ. प्रवीण मित्तल यांनी सांगितले की, या छोट्या मुलीचा हा मोठा आहार म्हणजे ईटिंग डिसऑर्डर असू शकते. अर्थात आतापर्यंत या प्रदीर्घ आहाराचा मुलीच्या शरीरावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. मात्र, तिच्या पालकांनी याबाबत आताच सावध झाले पाहिजे.
आतापासूनच चित्रकलेची आवड : सानवीचे वडील हेमंतकुमार हे एफसीआयमध्ये व्यवस्थापक आहेत. हेमंतकुमार यांनी सांगितले की, मुलीला आतापासूनच चित्रकलेची आवड आहे. तिला चित्रांविषयी कुणी काहीच सांगितलेले नाही, परंतु ती चित्रे छान काढते.
चित्रे काढणे व रंगवणे तिने पुस्तकांमधून शिकले आहे. सर्व प्रकारचे मोबाइल फोन ती सहजपणे ऑपरेट करू शकते.
जन्माच्यावेळी मिळाला सुदृढ बालिका पुरस्कार : सानवीचा जन्म माता कौशल्या रुग्णालयात झाला. जन्माच्यावेळी तिचे वय 5.5 किलो होते. वजन जास्त असल्याने तसेच प्रकृती चांगली असल्याने तिला सुदृढ बालिका हा पुरस्कार मिळाला होता.
अजून शाळेत गेली नाही, परंतु वैदिक मंत्र तोंडपाठ : वय लहान असल्याने सानिका अद्याप शाळेला जात नाही, परंतु तिला अनेक मंत्र मुखोद्गत आहेत. गायत्री मंत्र, हनुमानचालिसा, दुर्गामाता मंत्र, शंकराची आरती, ओंकार मंत्र, वैष्णोदेवी मातेची आरतीही तोंडपाठ आहे.