आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WORLD RECORD: कुतुब मीनार पेक्षाही उंच पोलवर फडकला तिरंगा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: फरीदाबादमधील टाउन पार्कमध्ये फडकला राष्ट्रध्वज तिरंगा)

पानीपत- राष्ट्रध्वज 'तिरंगा' हा देशाची शान, 'प्रेम' आणि भक्तीचे प्रतीक आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाने विविध क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ‘नॅशनल डिफेन्स डे’च्या निमित्ताने फरिदाबादमध्ये देशातला सर्वात उंच तिरंग्याचे ध्वजारोहण झाले. तमाम देशवासियांना अभिमान वाटावा, अशा डौलात तिरंगा फडकला आहे. या तिरंग्यांची उंची जवळपास 242 फूट असून त्याचे वजन 48 किलो आहे. त्यामुळे हा तिरंगा कुतुब मीनार (238 फुट) पेक्षाही जास्त उंच आहे.
फरिदाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजप प्रदेश प्रभारी अनिल जैन आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह देखील उपस्थित होते. देशाच्या या सर्वात उंच तिरंग्याची 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डळमध्ये नोंद होणार आहे. तिरंग्याची उंची आणि वजन अधिक असल्यामुळे रिमोट कंट्रोलच्या मदतीने ध्वजारोहण करण्यात आले.
अडीच कोटी रुपये खर्च...
राष्‍ट्रध्वजचा पोल उभारण्‍यासाठी अडीच कोटी रुपये खर्च आला. आमदार विपुल जैन यांच्या नवचेतना ट्रस्टने या पोलची उभारणी केली आहे. तिरंग्याची देखरेखची जबाबदारी मानव रचना युनिव्हर्सिटीने स्विकारली आहे.
पोल उभारणीसाठी लागले तीन महिने...
राष्‍ट्रध्वजाचा पोल उभा करण्यासाठी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागला. उल्लेखनिय म्हणजे नवचेतना ट्रस्टने या कामात सरकारतर्फे कोणत्याही प्रकारचे सहकार्य घेतले नाही.

रात्री देखील फडकत राहाणार तिरंगा
फरीदाबादमधील टाऊन पार्कमध्ये रात्रीदेखील तिरंगा फडकत राहाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी नवचेतना ट्रस्टच्यावतीने सर्व व्यवस्था करण्‍यात आली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, देशातील सगळ्यात उंच राष्ट्रध्वज तिरंगा...