आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HIM SHI OMC Leaked Audio Clips Leave Hp Minister

हिमाचलच्‍या मंत्र्याची ठेकेदाराच्‍या बायकोशी \'गंदी\' बात; क्लिप्स व्‍हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला (हिमाचल) - हिमाचल प्रदेशचे आरोग्‍य मंत्रीयांच्‍या तब्‍बल 19 ऑडियो क्लिप्स व्‍हायरल झाल्‍या असून, यात मंत्री ठाकूर हे एका ठेकेदाराच्‍या पत्‍नीसोबत ‘गंदी बात’ करत असून, तिला वारंवार ‘डार्लिंग’ म्‍हणत आहेत. एका अज्ञात व्‍यक्‍तीने या सर्व क्लिप्स मीडियाकडे दिल्‍या. शिवाय सोशल मीडियासुद्धा त्‍यांची धूम सुरू आहे. परिणामी, हिमाचलच्‍या राजकारणात खळबळ उडाली असून, ठाकूर यांनी राजीनामा द्यावा आणि शासनाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपने केली आहे.
वर्ष 2012 च्‍या हिमाचल विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे सर्व संभाषण आहे. यातील पाच क्लिप्समध्‍ये मंत्री ठाकूर हे एका ठेकेदाराच्‍या पत्‍नीसोबत रंगिल्‍या गप्‍पा करत आहेत. त्‍यांचा आवाज हळू असून, महिलेचे आवाज मोठा आहे. ही महिला ज्‍या ठेकेदाराची पत्‍नी आहे तो ठाकूर यांचा निकटवर्तीय आहे. दरम्‍यान, त्‍याने आणि त्‍याच्‍या पत्‍नीनेच ठाकूर यांना अडकवण्‍यासाठी हा डाव रचल्‍याची चर्चा आहे. या बाबत आपण पत्रकार परिषद घेऊन लवकरच खुलासा करणार असल्‍याचे ठाकूर यांनी सांगितले.
काय आहे ध्‍वनिमुद्रेकेत
एका रेकॉर्डिंगमध्‍ये मंत्री ठाकूर हे ठेकेदारच्‍या पत्नीला डार्लिंग म्‍हणताना स्‍पष्‍ट ऐकू येते. शिवाय आपल्‍याला भेट असेही ते तिला म्‍हणतात. तसेच आपल्‍या अडचणी आणि पक्षाच्‍या तिकीट वाटप धोरणाविषयी बोलतात आणि कुठल्‍या तरी सीडीबद्दल चर्चा करतात.
यापूर्वीसुद्धा झाला असा प्रकार
मे 2007 मध्‍ये माजी पर्यटन मंत्री विजय सिंह मनकोटिया यांनी मुख्‍यमंत्री वीरभद्रसिंह आणि त्‍यांच्‍या पत्नी प्रतिभासिंह यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या संभाषणाची सीडी समोर आणली होती.