आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

150 फुट दरीत कोसळली भाविकांची बस; 2 महिलांसह 10 जणांचा जागीच मृत्यू, 51 जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खूनी नाला वळणावर हा अपघात घडला आहे. - Divya Marathi
खूनी नाला वळणावर हा अपघात घडला आहे.
नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे गुरुवारी सकाळी प्रवाश्यांनी भरलेली बस 150 फुट दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच 51 लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेक गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सर्व जखमींवर टांडा येथील सरकारी रुगणालयात उपचार सुरू आहेत. 
 
- ही बस अमृतसर ते हिमाचल प्रदेशच्या देवी ज्वाला मंदिराच्या दिशेने जात होती. अपघात झालेल्या बसमध्ये 80 प्रवासी होते.
- ढलियारा येथील एका वळणावर असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस तब्बल 100-150 फुट खोल दरीत जाऊन कोसळली. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. 
- स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे, मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 2 महिलांचा आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. 
- मृत्यूमुखी पडलेले सगळेच अमृतसरचे रहिवासी होते.