आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेशात 350 फूट खाेल दरीत बस कोसळली; 28 प्रवाशी मृत्यूमुखी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बसमध्ये 43 प्रवासी होते. 28 जण वाहून गेले आहेत. - Divya Marathi
बसमध्ये 43 प्रवासी होते. 28 जण वाहून गेले आहेत.
सिमला- हिमाचल प्रदेशातील खनेरी-रामपूरदरम्यान सिमल्यापासून १४० किमी अंतरावर ३५० फूट खाेल दरीत बस काेसळून झालेल्या अपघातात २८ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले अाहेत. बसमध्ये चालक-वाहकासह ३६ जण हाेते. ही दुर्घटना भारत-तिबेट राष्ट्रीय महामार्गावर खनेरी-रामपूरदरम्यान घडली. टायर फुटल्यामुळे अनियंत्रित झाल्याने ही बस दरीत काेसळल्याचे सांगण्यात येत अाहे. याबाबत डेप्यूटी कमिशनर राेहनचंद ठाकूर यांनी सांगितले की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचे मृतदेह दरीतून काढण्यात अाले अाहेत. 
 
- सूत्रांच्या माहितीनुसार, नदीचा प्रवाह एवढा होता की ज्या ठिकाणी बस कोसळली त्यापासून एक किलोमीटर दूर सापडली.  
- स्थानिक प्रशासन वेगाने शोधकार्याला लागले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
- या दुर्घटनेतील 7 जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...