आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Himachal Highcourt Judge Suspended For Harassing Woman Judge Colleague

महिला सहकारीसोबत 'गंदी बात'; हिमाचल प्रदेशातील न्यायाधीश सस्पेंड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला- हिमाचल प्रदेशातील एका न्यायाधीशाने त्याच्या महिला सहकारी न्यायाधीशासोबत अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी न्यायाधीशला हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. याचबरोबर दोन महिन्यांत याप्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

पीडिती महिला न्यायाधीशने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी आपल्याशी नेहमी अश्लिल वर्तन करायचा. बोलताना घाणेरडे शब्दांचा वापर करायचा. इतकेच नव्हे तर त्याने मनालीतील स्पेन रिसॉर्ट नामक हॉटेलमध्ये आपल्याला नेण्याचाही प्रयत्न केला होता.
न्यायाधीश परिषदेत घडली ही घटना...
जून महिन्यात झालेल्या न्यायाधीशांच्या परिषदेत ही घटना घडली. 'ड्रग एडिक्शन' या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. स्टेट ज्यूडिशियल सर्व्हिसच्या अधिकार्‍यांना 3-4 दिवस आधीच मनालीत‍ निमंत्रित करण्यात आले होते. 11 ते 13 जून या काळात झालेल्या परिषदेत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशांसह हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश आणि राज्यातील न्यायाधीशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
पीडित महिला न्यायाधीशने परिषद सुरु असताना हा प्रकार थेट हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीशांच्या कानावर घातला. मुख्य न्यायाधीशांनी या घटनेची गंभीर दखल घेवून प्राथमिक चौकशीअंती आरोपी न्यायाधीशाला तडकाफडकी सस्पेंड केले आहे.