आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राजकुमारीने केलाय FRAUD? मुख्यमंत्री कन्येची होणार CBI चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपराजिता सिंह - Divya Marathi
अपराजिता सिंह
(कन्या अपराजितासोबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह)

शिमला- हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा आज (23 जून) वाढदिवस. यानिमित्त आम्ही आपल्या वाचकांसाठी वीरभद्र सिंह यांच्या‍विषयी विशेष माहिती देत आहोत.

रामपूर बुशहर संस्थानचे राजा आणि राज्याचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह हे मागील पाच दशकांपासून सक्रीय राजकारणात आहेत. सिंह यांच्या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य राजकारणात आहेत. राजशाही आता इतिहास जमा झाली असली तरी वीरभद्र सिंह यांचा ऐटबाजपणा एका राजापेक्षा कमी नाही. पत्नी प्रतिभा सिंह यांना राज्यातील लोक राणी, कन्या अपराजिताला राजकुमारी आणि मुलगा विक्रमादित्य याला राजकुमार असे संबोधतात.
हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी निवडणुका होणार आहे. मात्र, त्या आधीच वीरभद्र सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वीरभद्र सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.
सोमवारी सीबीआयने वीरभद्र सिंह आणि त्यांच्या नातेवाईकांची प्राथमिक चौकशी केली.
प्राथमिक चौकशीत वीरभद्र यांच्याविरुद्ध पुरावे आढळल्यास सीबीआय गुन्हा दाखल करणार आहे.

अपराजितायवरही आरोप...
मुख्यमंत्री कन्या अपराजितावरही भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. अपराजिताच्या नावावरही एलआयसी पॉलिसी खरेदी करण्‍यात आल्या आहे. अपराजिता ही या प्रकरणात किती सहभागी आहे, याचा सीबीआय तपास करत आहे. या प्रकरणात अपराजिता दोषी आढळल्यास तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अपराजिताचा विवाह मागील एप्रिल महिन्यात पंजाबमधील एका राजघराण्यातील राजकुमार अंगद यांच्यासोबत झाला होता. दिल्ली शाही विवाह सोहळा झाल्यानंतर शिमला येथे एक शानदार रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.

2009-11 या यूपीए सरकार काळात वीरभद्र उद्योग मंत्री होते. या काळात आनंद चौहान याच्या माध्यमातून वीरभद्र यांनी 6.1 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि नातेवाईकांच्या नावावर विमा पॉलिसी काढल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर वीरभद्र सिंह, पत्नी प्रतिभा, मुलगा विक्रमादित्य, कन्या अपराजिता आणि एलआयसी एजेंट आनंद चौहान यांना चौकशीसाठी बोलवले जाईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा, वीरभद्र सिंह यांचा ऐटबाजपणा