आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचलात डोंगर कोसळला; ढिगाऱ्याखाली 2 बस दबल्या, 48 मृतदेह हाती, मुसळधार पावसाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंडी / पधर- हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे मंडी-पठाणकोट महामार्गावर शनिवारी रात्री दरड कोसळून दोन बस ढिगाऱ्याखाली दबल्या. यात किमान ५० जणांचा मृत्यू झाल्याची भीती असून रात्रीपर्यंत ४६ मृतदेह काढण्यात आले होते. डोंगरावरून कोसळणाऱ्या दगड व मातीचा वेग इतका होता की राज्य परिवहन महामंडळाची चंबाहून मनालीस जाणारी बस ८०० मीटर दरीत ढिगाऱ्याखाली दबली. दुसरी बस मनाली-कटडा मार्गाजवळ ढिगाऱ्याखाली दबली. ही बस रात्री उशिरापर्यंत सापडली नव्हती. यामुळे सुमारे ५०० मीटर राष्ट्रीय महामार्ग उद््ध्वस्त झाला आहे.
 
या नैसर्गिक आपत्तीनंतर लष्कर, एनडीआरएफ आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. यामुळे मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. या भागात भूस्खलन होऊ शकते हा धोका ओळखून परिसरात राहणाऱ्या काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री मुसळधार पावसामुळे कोटरोपीजवळ डोंगरांवरून हळूहळू दगड कोसळू लागले होते. यामुळे मंडी-पठाणकोट महामार्गावर दोन्ही बाजूंकडील वाहने थांबली होती. याच वेळी अचानक एक टेकडीच खचली आणि दगड-मातीमध्ये दोन बस तसेच काही वाहने अडकली.

कितीतरी वेळ किंचाळ्या...
घटनास्थळी रात्रीच्या अंधारात कितीतरी वेळ महिला-पुरुष, मुलांच्या किंचाळ्या ऐकू येत होत्या. रात्रीची वेळ असल्याने नेमके काय घडले आहे, याचे गांभीर्य किती आहे हे कुणालाच कळत नव्हते. अखेर काही तासांनी मदतकार्य सुरू झाले. मात्र, दुसरी वाहून गेलेली बस उशिरापर्यंत सापडू शकली नव्हती.

पंतप्रधान मोदींकडून आपद्ग्रस्तांचे सांत्वन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारण व्हावी, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
- ढगफुटीमुळे हिमाचल प्रदेशातील या भागात रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे डोंगर खचला.
- रात्री उशिरापर्यंत पहिल्या बसमधील ३४ प्रवाशांचे मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश.

पुढील स्‍लाइडवर...दगड-मातीच्या लाटेत आम्ही वाहून गेलो...दोन तास मी किंचाळत होते
 
बातम्या आणखी आहेत...