आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेवर तैनात आहेत असंख्य ‘बजरंगी भाईजान’,रस्ता भटकलेल्या मुलांच्या कथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- ‘बजरंगी भाईजान’ अनेकांनी पाहिला असेल. मुन्नी या निष्पाप मुलीला हीरो तिच्या घरी कसे पोहोचवतो, हेही आठवत असेल. पण हे अाहेत काही खरेखुरे किस्से. ‘मुन्नी’चे आणि ‘मुन्ना’चे. पण त्यांच्या या किश्श्यांत एक समानता आहे. ती म्हणजे त्यांचे हीरो. ते फिल्मी नाहीत, तर खरेखुरे.

आपापल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणारे जवान संधी येताच सरहद्द ओलांडणाऱ्या मुलांना मायभूमीत परत पाठवतात. मुले जवळ असेपर्यंत ते त्यांची संपूर्ण काळजी घेतात. बिकानेरमधील खाजूवाला येथील आठवर्षीय मुलगी पूजाला याची चांगली जाणीव आहे.
सहा वर्षांची असताना पूजा २९ मार्च २०१३ ला चुकून पाकच्या हद्दीत गेली. पाकिस्तानी रेंजर्सनी तिला पकडले. एक महिला अधिकारी तिला सोबत घेऊन गेली. पूजा अनवाणी होती. तिच्या पसंतीच्या सँडल्स खरेदी करण्यात आल्या. नवा ड्रेस शिवला. पाच दिवस तिला घरी ठेवले आणि ४ एप्रिलला मिठाई-चॉकलेट देऊन परत पाठवले. बीएसएफ जवानांकडेही असे किस्से आहेत. राजस्थान फ्रंटियरचे आयजी डॉ. बी. आर. मेघवाल यांच्यानुसार, ‘अशा घटना घडतातच. सीमेवर एखादा मुलगा असा भटकत इकडे येतो अथवा तिकडे जातो. मात्र, आम्ही त्यांना लगेच त्यांच्या देशात पाठवतो. मुले कोणत्याही देशाची असू द्या, ती देवाचीच रूपं असतात.’
माराच्या भीतीने भारतात अाला, पण...
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील भावलनगरचा नदीम सातवीत होता. एके दिवशी होमवर्क न केल्याने वडिलांनी मारहाण केली. शेतात पाठवले. त्यामुळे नाराज नदीम कुटुंबीयांना न सांगताच निघाला आणि भारतात दाखल झाला. बीएसएफने दुसऱ्याच दिवशी त्याला पाकिस्तानी रेंजर्सकडे सोपवले.

संसदेवर हल्ला, तरीही मुनीर मायदेशी
२००३ मध्ये मुनीरही गुरे चारताना भारतात आला. त्या वेळी संसद हल्ल्यामुळे दोन्ही देशांत तणाव होता. पण त्याच्या निरागसतेमुळे बीएसएफच्या जवानांनी पंतप्रधान वाजपेयी यांच्या आदेशावरून त्याला पाकिस्तानला पाठवले.
बातम्या आणखी आहेत...