लखनौ- 'असहिष्णुते'च्या मुद्द्यावर अभिनेता
आमिर खानने केलेल्या विधानावर रान पेटले आहे. आमिरविरुद्ध जवळपास सर्वच क्षेत्रातून तिखट प्रतिक्रिया नोंदवण्यात येत आहे. अखिल भारतीय हिंदु महासभेने तर आमिर खानच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
आमिर आणि
शाहरुख खान दोन्ही देशद्रोही असून अशा व्यक्तींचा शिरच्छेद करून त्यांना चौकात खुलेआम लटकावायला हवे, असे हिंदु महासभेचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी म्हटले आहे. कमलेश तिवारी यांनी बुधवारी एक प्रसिद्धपत्रक जाहीर करून आमिर खानच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.
आमिरने पत्नीला दिला देशाबाहेर जाण्याचा सल्ला...
दुसरीकडे, आमिर खानवर चहुबाजुंनी टिका होत आहे. दिल्लीसह कानपूरमध्ये त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमिरच्या बंगल्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. सद्यपरिस्थिती पाहाता आमिरने पत्नी किरण रावला काही दिवसांसाठी देशाबाहेर जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळाली आहे.
कानपूरमध्ये आमिर विरोधात याचिका
कानपूरमधील एसीएमएम-3 कोर्टात एक वकीलाने आमिरविरुद्ध याचिका दाखल केली आहे. याचिकेवर एक डिसेंबरला सुनावणी होणार आहे. मात्र, दुसरीकडे समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायम सिंह यांनी आमिर खानची पाठराखण केली आहे. देशात राहाणार्या प्रत्येक व्यक्तीला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. केंद्र सरकारने आधी आमिर खानचे विधान लक्षात घ्यायला हवे, असे मुलायम सिंह यांनी म्हटले आहे.
आमिर व शाहरुखला देशाने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे....
आमिर खान व
शाहरुख खानला देशातील जनतेनेच प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. दोघांनी पैसा भारतातून कमावला आहे. आणि आता त्यांना या देशाचीच भीती वाटते, याचे आश्चर्य वाटते. आमिर व शाहरुख दोघे देशद्रोह असल्याचा आरोप देखील कमलेश तिवारी यांना केला आहे. दोघांचा शिरच्छेद करून त्यांना चौकात लटकावावे. भविष्यात पुन्हा असे वक्तव्य करायला कोणाची हिम्मत होणार नाही.
'असहिष्णुतेच्या मुद्द्यावर वक्तव्य करणार्यांना विदेशातून फंड'
कमलेश तिवारी यांनी म्हटले की, आमिर खान असो अथवा शाहरुख खान, असहिष्णुतेच्या मुद्द्यावर उलटसुलट वक्तव्य करणार्यांना विदेशातून फंड मिळत असल्याचे कमलेश तिवारी यांनी म्हटले आहे. देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी आमिरसारख्या लोकांनी कट रचला आहे. भारत माता या सगळ्यांना कधीच माफ करणार नाही.
'आमिर और शाहरुखच्या सिनेमांवर बहिष्कार टाका'
कमलेश तिवारी यांनी देशातील जनतेला आवाहनही केले आहे. आमिर खानचा 'दंगल' व शाहरुख खानचा 'दिलवाले' सिनेमावर बहिष्कार टाकून देशातील जनतेने त्यांना चांगलाच धडा शिकवायला हवा. 'तारे जमीनवर आल्यानंतरच त्यांना त्यांची जागा कळेल. जो खरा भारतीय असेल तो आमिर आणि शाहरुखचे सिनेमा पाहाणार नाही, असेही कमलेश तिवारी यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, 'इस्लाम मुक्त भारत' या अभियानातून सगळ्यांना हद्दपार करणार...