आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Mahasabha Performed Buddhi Shuddhi Yagya For Protesting Authors

हिंदू महासभेने केला बुद्धी-शुद्धी यज्ञ; म्‍हटले - पुरस्कार परत करणारे देशद्रोही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीगड (उत्तर प्रदेश) - मोदी सरकारच्‍या विरोधात देशामध्‍ये साहित्यिक पुरस्‍कार परत देत आहेत. त्‍यामुळे हिंदू महासभेच्‍या वतीने साहित्यिकांचा विरोध म्‍हणून ‘बुद्धी-शुद्धी’ यज्ञ केला गेला. केंद्रीय मंत्री वेंकैया नायडू म्‍हणाले, '' बुद्धिजीवी वर्गाने अशा लहान-सहान घटनांपासून दूर राहावे. यामुळे जगात देशाची प्रतीमा खराब होते.''

काय आहे प्रकरण ?
यूपीतील दादरी जिल्‍ह्यात बीफ खाण्‍याच्‍या अफेवरून जमावाने एका व्‍यक्‍तीला ठेचून मारले. त्‍यापूर्वी कर्नाटकमध्‍ये प्रसिद्ध लेखक कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली. त्‍यामुळे या विरुद्ध आतापर्यंत 30 पेक्षा अधिक लेखकांनी आपला साहित्‍य अकादमी पुरस्‍कार सरकारला परत केला आहे.
काय म्‍हटले हिंदू महासभेने?
पुरस्‍कार परत देणाऱ्या साहित्यिकांच्‍या विरोधात हिंदू महासभेने मोर्चा उघडला आहे. रविवारी अलीगडमध्‍ये हिंदू महासभेने या साहित्यिकांना बंडखोर म्‍हटले. त्‍यांच्‍यासाठी त्‍यांनी ‘बुद्धि-शुद्धि’ यज्ञ केला. हिंदूमहासभेचे राष्‍ट्रीय सचिव पूजा शकुन पांडे म्‍हणाले, “आम्‍ही केलेल्‍या यज्ञामुळे पुरस्‍कार परत करणाऱ्या साहित्यिकांना बुद्धी मिळेल. ज्‍यांनी पुरस्‍कार परत केला ते देशद्रोही आहेत'', असा आरोपही त्‍यांनी केला.
प्रसिद्ध कवी मनुव्वर राणा यांनीही परत केला पुरस्‍कार
उर्दूतील प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांनीही आपला पुरस्‍कार परत केला. दरम्‍यान, साहि‍त्यिकांकडून देशात पुरस्‍कार परत करण्‍याचे सत्र सुरूच आहे.
आतापर्यंत यांनी केला साहित्य अकादमी पुरस्‍कार परत
लेखकाचे नाव कोणत्‍या भाषेतील साहित्यिक
मुनव्वर राणा उर्दू
काशीनाथ सिंह हिंदी
उदय प्रकाश हिंदी
नयनतारा सहगल अंग्रेजी
अशोक वाजपेयी हिंदी
साराह जोसेफ मलयालम
गुलाम नबी ख्याल कश्मीरी
रहमान अब्बास उर्दू
वरयाम संधू पंजाबी
गुरबचन सिंह भुल्लर पंजाबी
अजमेर सिंह औलख पंजाबी
जी.एन. रंगनाथ राव कन्नड
मंगलेश डबराल हिंदी
राजेश जोशी हिंदी
गणेश देवी गुजराती
श्रीनाथ डी.एन. कन्नड
के. वीरभद्रप्पा कन्नड
रहमत तारीकेरी कन्नड
बल्देव सिंह पंजाबी
जसविंदर पंजाबी
दर्शन भट्टर पंजाबी
सुरजीत पाटर पंजाबी
चमन लाल पंजाबी
होमेन बोरगोहेन असमिया
मंदाक्रांत सेन बांग्ला
के.एन. दारूवाला इंग्रेजी
नंद भारद्वाज राजस्थानी
के. नीला कन्नड
काशीनाथ अंबाल्गी कन्नड
या साहित्यिकांनी दिला साहित्य अकादमीचा राजीनामा
साहित्यिकाचे नाव भाषा
शशी देशपांडे कन्नड
के. सदचिदानंदन मलयालम
पी.के. पाराकाड्डव मलयालम
अरविंद मालागट्टी कन्नड