लखनऊ - व्हॅलेंटाइन डेला म्हणजे १४ फब्रुवारीला सार्वजनिक स्थळी प्रेमाचे प्रदर्शन करणार्या प्रेमीयुगुलांचा विवाह लावून देण्याची मोहीम हिंदू महासभेने देशभर आखली आहे. त्यासाठी मोठ्या शहरांत पथकेही तयार करण्यात आली आहेत.
हिंदू महासभेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक म्हणाले, ‘व्हॅलेंटाइन डेला प्रेमीयुगुले बागा, मॉल, ऐतिहासिक स्थळे, हॉटेलमध्ये भेटतात. हिंदू महासभेची पथके तेथे जाऊन त्यांना व्हॅलेंटाइनची प्रथा किती कमकुवत आहे याची माहिती देतील.
जी जोडपी सज्ञान आहेत आणि आम्ही प्रेमात पडलो असून हे नाते पुढे न्यायचे आहे असे जे म्हणतात त्यांनी लग्नच करायला हवे. आम्ही त्यांचा मार्ग सुलभ करू. पण ज्यांना विवाह करायचा नाही, त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशाराही कौशिक यांनी दिला आहे.