आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Mahasabha Wrote Letter To Rss On Iftar Party

RSSच्या \'इफ्तार पार्टी\'वर हिंदू महासभा नाराज, ऑफिस रिकामे करण्याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- राष्ट्रीय स्वयंसवेक संघद्वारा (आरएसएस) आयोजित 'इफ्तार पार्टी' आणि 8 ऑगस्टला लखनौमध्ये आयोजित करण्‍यात आलेल्या उमेला बैैठकीच्या अखिल भारतीय हिंदू महासभेने विरोध दर्शवला आहे. हिंदू महासभेने आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून इफ्तार पार्टी आणि उमेला बैठकीचे आयोजन रद्द करण्‍याची मागणी केली आहे.

इफ्तार पार्टी आणि उलेमा बैठकीचे आयोजन बंद न केल्यास देशभरातील आरएसएस आणि भाजपचे कार्यालय रिकामे करावे, अशी धमकी देण्यात आली आहे. देशभरात हिंदू महासभेच्या जागांवर आरएसएस आणि भाजपचे कार्यालये सुरु आहेत.

..तर मुस्लिम धर्मगुरु आणि संघाच्या नेत्यांना प्रवेशबंदी
हिंदू महासभा आरएसएसच्या इफ्तार पार्टी आणि 8 ऑगस्टला रवींद्रालय येथे होणार्‍या उलेमा बैठकीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे. संघ कार्यकर्त्यांना घेराव घालणार आहे. तसेच मुस्लिम धर्मगुरुंना शहरात प्रवेशबंदी केली जाणार असल्याचे हिंदू महासभेच्या सूत्रांनी सांगितले आहे.

दहशत, जातीय दंगल, तिरस्कार आणि हिंसामुक्त भारत अशी या बैठकीची थीम असेल. परंतु ते आम्हाला मान्य नाही. आठ ऑगस्टला र‍वींद्रालयवर हिंदू महासभेचे कार्यकर्ता मोठ्यासंख्येने उपस्थित राहातील. रवींद्रालय बंद ठेवले जाईल. तसेच मुस्लिम धर्मगुरुंना प्रवेश दिला जाणार नसल्याचा इशारा कार्यवाहक अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी ‍दिला आहे.