आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Outfit Leader Controversial Statement On Muslims And Christians

21 डिसेंबर 2021 पर्यंत सर्वांना करणार हिंदू - धर्म जागरण मंच अध्यक्षांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलिगड (उत्तर प्रदेश)- देशात धर्मांतराचा मुद्या गाजत आहे. संसदेत या मुद्यावरून रोज गदारोळ सुरु आहे. असे असताना उत्तर प्रदेशात धर्मांतरासाठी सक्रिय असलेले धर्म जागरण मंचचे नेते राजेश्वर सिंह यांनी 21 डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे धर्मांतर करुन त्यांना हिंदू करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये विश्व हिंदू परिषदेने ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या कुटुंबांना हिंदू धर्मात आणले आहे. तर, उत्तर प्रदेशातील बहराइच येथे 70 हिंदूंनी ख्रिश्चन धर्म स्विकाल्याचे समोर आले आहे.
'मुस्लिम आणि ख्रिश्चनांना भारतात राहाण्याचा अधिकार नाही'
अलिगड येथे 25 डिसेंबर रोजी पाच हजार लोकांचे धर्मांतर करण्याची योजना तयार केल्यामुळे चर्चेत आलेला धर्म जागरण मंच आणि त्याचे नेते राजेश्वर सिंह यांनी बुधवारी आणखी एक वादग्रस्त घोषणा केली आहे. बुधवारी उत्तर प्रदेशातील एटा येथील पत्रकार परिषदेत राजेश्वर सिंह यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चनांना भारतात राहाण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. 2021 पर्यंत भारताला मुस्लिम आणि ख्रिश्चन मुक्त करणार असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, की आमचा उद्देश भारताला हिंदू राष्ट्र करणे आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना हिंदू धर्मात आणल्याचा दावा त्यांनी केला.
हिंदू धर्म जागरण मंच अलिगड येथे 25 डिसेंबर रोजी धर्मांतराचा मोठा कार्यक्रम घेणार होते. यात हजारो मुस्लिम आणि ख्रिश्चनांना हिंदू करण्याची त्यांची योजना होती. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार योगी आदित्यनाथ यांचेही पाठबळ होते. ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार होते. मात्र, संसदेत या मुद्यावरुन रोज गदारोळ सुरु झाल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
70 हिंदूंनी स्विकारला ख्रिश्चन धर्म
उत्तर प्रदेशातील बहराइच येथील कमलपुरी गावातील 70 जणांनी हिंदू धर्माचा त्याग करुन ख्रिश्चन धर्म स्विकारला असल्याची माहिती आहे. यातील अधिक लोक हे अनुसुचित जाती, जमातीचे आहेत. इंडिया होप सेंटरच्या कार्यकर्त्यांनी यांना ख्रिश्चन धर्म स्विकारायला लावला असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. इंडिया होप सेंटरचे प्रमुख कोण आहे, त्याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, की पुरस्थितीमध्ये इंडिया होप सेंटरच्या कार्यकर्त्यांनी गावकर्‍यांची मदत केली होती. यादरम्यानच त्यांनी गावकर्‍यांना धर्मांतर केल्यास तुमचे आयुष्य बदलेले असे आश्वासन दिले होते. त्यामुळेच गावातील 70 लोकांनी आठवड्यापूर्वी ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, बिहारमध्ये ख्रिश्चन धर्म स्विकारणार्‍या कुटुंबावर गावाचा बहिष्कार