आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मांतर घडवत नसल्याने हिंदूंच्‍या लोकसंख्‍येत घट: केंद्रीय गृह राज्यमंत्री रिजिजू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी सरकारमधील मंत्री किरण रिजिजू यांनी सोमवारी एका ट्वीटमध्ये म्हटले, भारतात हिंदुंची लोकसंख्या घटत आहे. त्यामागचे कारण म्हणजे, हिंदु इतर धर्मातील लोकांना धर्मांतर करायला प्रवृत्त करत नाही. - Divya Marathi
मोदी सरकारमधील मंत्री किरण रिजिजू यांनी सोमवारी एका ट्वीटमध्ये म्हटले, भारतात हिंदुंची लोकसंख्या घटत आहे. त्यामागचे कारण म्हणजे, हिंदु इतर धर्मातील लोकांना धर्मांतर करायला प्रवृत्त करत नाही.
नवी दिल्ली - मोदी सरकारमध्ये मंत्री असलेले किरण रिजिजू यांनी सोमवारी एका ट्वीटमध्ये म्हटले, भारतात हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. त्यामागचे कारण म्हणजे, हिंदु इतर धर्मियांना धर्मांतर करायला प्रवृत्त करत नाही. अरुणाचल प्रदेश काँग्रेस कमेटीने भाजप सरकार राज्याला हिंदु स्टेट बनवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना किरण रिजिजू यांनी हे ट्विट केले आहे. 

काय आहे प्रकरण.. 
- अरुणाचल प्रदेश काँग्रेस कमेटीने काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की, भाजप सरकार राज्याला हिंदु राज्य बनवण्याचा प्रयत्न करत आहे. कमिटीचे हे वक्तव्य वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले होते. 
- सोमवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी अनेक ट्वीट केले. त्यापैकी एका ट्वीटमध्ये त्यांनी या आरोपाचा स्क्रीनशॉट शेयर केला. 
- त्यात रिजिजू यांनी म्हटले, भारतात हिंदुंची लोकसंख्या घटत आहे. त्याचे कारण म्हणजे हिंदू कोणाला कनव्हर्ट करायला लावत नाहीत. इतर शेजारी देशांच्या तुलनेत भारतातील अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचेही ते म्हणाले. 
- रिजिजू अरुणाचलचेच असून ते भाजपचा राज्यातील मोठा चेहरा आहेत. अरुणाचलमध्ये हेल्या वर्षापासून राजकीय स्थिती ठीक नाही. काँग्रेस चत्या आमदारांनी येथे त्यांच्याच मुख्यमंत्र्याला पदावरून हटवले आहे. काँग्रेसने त्याचा आरोप भाजपवर लावला होता. 
- आणखी एका ट्वीटमध्ये रिजिजू यांनी काँग्रेसने अशी चिथावणीखोर वक्तव्ये करायला नको असे म्हटले आहे. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून येथे सर्वधर्मिय आनंदाने राहतात असे ते म्हणाले.  

असा सुरू झाला वाद.. 
- भाजप हिंदुत्ववादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप काँग्रेसने रविवारी केला होता. 
- काँग्रेसचे सचिन मिनकिर लोलेन म्हणाले, घरवापसीच्या माध्यमातून अरुणाचलला हिंदुबहुल राज्य बनवण्याचा छुपा अजेंडा नरेंद्र मोदी राबवत आहेत. लोलेन म्हणाले याठिकाणी इतर जाती धर्मांतील लोकांना हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. 
- या आरोपानंतर स्टेट बीजेपी चीफ तापीर गाओ म्हणाले, अरुणाचल प्रदेश काँग्रेसचा इतिहासच हा आहे की, ते इतर जाती धर्मांना संपवण्याचे काम करतात. आमचा पक्ष तर त्यांच्या विकासाचे काम करतो. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...