आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदु विधवेने दंगलखोरांपासून केला 10 मुस्लिमांचा बचाव, मुख्यमंत्र्यांनी केला सन्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - शैल देवी यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री. - Divya Marathi
फोटो - शैल देवी यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री.
मुजफ्फरपूर - धार्मिक हिंसाचाराचे साक्षीदार ठरलेल्या अजिजपूर गावातील शैल देवी नावाच्या एका विधवा महिलेने 10 मुस्लिमांचे प्राण वाचवले. जमाव त्यांच्या शेजार्‍यांची हत्या करू शकतो हे लक्षात घेत, शैल देवी यांनी त्यांना घरात लपवले. दंगलखोरांनी त्यांनी घरात कोणी नसल्याचे सांगितले. ते घरात घुसायचा प्रयत्न करू लागले तेव्हा त्यांना थांबवलेही. त्यामुळे ते परतले असे शैल देवी म्हणाल्या. विशेष म्हणजे तणाव निवळेपर्यंत आपल्या दोन मुलींच्या मदतीने त्यांनी दरवाजावर निगराणी केली.

शेजार्‍यांनी घाबरवल्याने मुस्लिमाकडे लपल्या
शैल देवींनी वाचवलेल्यांमध्ये आश मोहम्मद यांचाही समावेश होता. शैल देवी आमच्यासाठी देवाप्रमाणे धावून आल्या असे ते म्हणाले. या प्रकरणानंतर शेजार्‍यांनी शैल देवी यांना घाबरवले. दंगलखोरांना याबाबत समजले तर ते तुलाच शिक्षा देतील अशी भीती तिला दाखवली. त्यानंतर घाबरून शैल देवी मोहम्मदच्या घरात लपल्या होत्या. पण जिल्हा प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर त्या समोर आल्या. रविवारी शेजारच्या गावातील हजारो लोकांनी अजिजपूरवलर हल्ला केला होता.
मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार
मुख्यमंत्र्यांनवी शैल देवी यांना 51 हजार रुपयांचा धनादेश, साडी, शाल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. त्यांनी शैल देवी यांना झाशीच्या राणीची उपमा दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिच्या दोन मुली रीता कुमारी आणि रूपन कुमारी यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी वीस हजार रुपयांची घोषणाही केली.
प्रकरण काय?
वेगवेगळ्या धर्माच्या तरुण तरुणीच्या प्रेमप्रकरणामधून ही दंगल उसळली होती. या प्रकरणात मुलाचे अपहरण आणि नंतर हत्या करण्यात आली होती. अजिजपूरमध्ये मुस्लिम बहुसंख्याक आहेत.
पुढे वाचा, अजिजपूरला पोहोचले लालू आणि मांझी...