आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Woman Must Produce 4 Kids Says Sakshi Maharaj

भाजपचे फायरब्रँड साक्षी महाराज म्हणाले- प्रत्येक हिंदू दाम्पत्याने 4 अपत्य जन्मास घालावी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ (उत्तर प्रदेश) - वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहाणारे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार साक्षी महाराज यांनी एका हिंदू कुटुंबांने किमान चार अपत्यांना जन्म द्यावा असे म्हटले आहे. मेरठमधील संतांच्या संमेलनात ते बोलत होते.
साक्षी महाराज म्हणाले, 'चार पत्नी आणि चाळीस मुले ही पद्धत आता भारतात चालणार नाही. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आता प्रत्येक हिंदू कुटुंबाने कमीत कमी चार मुले होऊ दिली पाहिजे.' या चार मुलांचे काय करायचे याचा निर्णयही साक्षी महाराजांनी घेऊन टाकला आणि सांगितले, की यातील एक मुल संताना तर दुसरे देशसेवेसाठी (लष्करात) पाठवावे आणि दोन स्वतः कडे ठेवा.
गो हत्येसाठी मिळणार शिक्षा
हिंदू कुटुंबाना लोकसंख्या वाढीचा सल्ला देण्यावरच साक्षी महाराज थांबले नाही. ते म्हणाले, की पुढील काही दिवसांत संसदेत गो हत्या आणि धर्मांतराच्या विरोधात मृत्यूदंडाची शिक्षा देणारा कायदा पारित केला जाईल. त्यांनी 'घरवापसी' आणि 'धर्मांतर' या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचेही सांगितले. काही लोक धर्मांतराच्या मुद्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देत असल्याचे ते म्हणाले.
राम मंदिरावर बोलले साक्षी महाराज
भाजपचे फायरब्रँड नेते साक्षी महाराज यांनी राम मंदिरावरही वक्तव्य केले. ते म्हणाले, जगातील कोणतीही ताकद आयोध्देत राम मंदिर बांधण्यास रोखू शकत नाही.
या कार्यक्रमाला उपस्थित साध्वी प्राची म्हणाल्या, की घरवापसी कार्यक्रम सुरुच राहाणार आहे. भारत हे हिंदू राष्ट्र असून ते यापुढेही ते हिंदू राष्ट्रच राहील.