आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपल्याकडील लठ्ठपणा चीन, अमेरिकेपेक्षा वेगळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर २६ नोव्हेंबर हा दिवस जगभरात स्थूलत्व निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ओबेसिटी म्हणजे स्थूलत्व. यावर चर्चा खूप होते, पण कृती योजना नसते. स्थूलपणाचा संबंध आपल्या जीवनशैलीशी असतो. यामुळे सुरुवात स्वत:पासूनच केली पाहिजे. लठ्ठपणा हा आजार नव्हे तर अनेक आजारांचे मूळ आहे. . लठ्ठपणा रोखण्यासाठी आरोग्य योजना किंवा कृती योजना नाही.
लठ्ठपणावर कोणते संशोधन करत आहात? : आम्ही आधुनिक संशोधन करत आहोत. गेल्या ७ वर्षांत ६८०० रुग्णांवर संशोधन केले. लठ्ठपणात भारतीयांची जनुकीय संरचना अमेरिकी आणि चिनी लोकांपेक्षा खूप वेगळी आहे. आपण स्थूलपणात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. मोहक बॅरियाट्रिक सेंटरमध्ये रुग्णांच्या डेटा अॅनालिसिसच्या आधारे उपचार पद्धती खूप आधुनिक आणि प्रभावशाली तयार करण्यावर कार्य सुरू आहे.
लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका किती? : भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आपल्याकडे २८ ते ३५ बीएमआय असलेले ५ कोटींहून अधिक लोक लठ्ठपणाबरोबरच टाइप-२ च्या मधुमेहाशी लढत आहेत.
बॅरियाट्रिक सर्जरी किती उपयुक्त ठरते? : लठ्ठपणाच्या क्रॉनिक स्टेजमध्ये कसलेही व्यायाम किंवा डाएट परिणामकारक नसतात. यात बॅरियाट्रिक सर्जरी यशस्वी ठरते. मोहक सेंटरमध्ये जीएलपी वन अॅनालॉगच्या इंजेक्शनने वजन कमी होऊ शकते. चालणे-फिरणे अवघड झाल्यास शस्त्रक्रिया करावी. आम्ही पोटाचा आकार कमी करून औषधी व स्पेशल डाएट प्लॅनच्या साह्याने हळूहळू वजन कमी करतो.
आज स्थूलत्व निवारण दिन
यानिमित्ताने दैनिक भास्करने प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. मोहित भंडारी यांच्याशी संवाद साधला.
बातम्या आणखी आहेत...