आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील भीषण दुष्काळ : अन्न, पाण्याविना अनेकांनी गमावले प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1943 मध्ये दुसऱ्या वर्ल्ड वॉर दरम्यान बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळाला मानव निर्मित संहान म्हटले जाते. - Divya Marathi
1943 मध्ये दुसऱ्या वर्ल्ड वॉर दरम्यान बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळाला मानव निर्मित संहान म्हटले जाते.
उन्हाळा सुरू होताच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. सलग दोन वर्षांच्या दुष्काळामुळे महाराष्ट्र सरकारने 2016-17 चे अर्धे बजेट कृषी क्षेत्राला देण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याच्या नासाडीबाबत बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट संघटनेला मुंबई उच्च न्यायालयाने आयपीएलच्या सामन्यांवरून फटकारले होते.

ब्रिटिश काळातील नऊ दुष्काळ
- भारतात ब्रिटीश राजवट असताना एकूण नऊ दुष्काळांचा सामना करावा लागला होता.
- यात पहिला दुष्काळ 1769-70 मध्ये बंगालमध्ये (सध्याचे प. बंगाल) पडला होता. त्यात सुमारे एक कोटी लोक मारले गेले असा अंदाज आहे.
- बंगालच्या त्यावेळच्या लोकसंख्येचा एक तृतीयांश एवढा हा आकडा होता.
- त्या दरम्यान बंगालमधध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, आसाम आणि बांगलादेशही होते.

मुंबईत चार लाख ठार
- 1899 ते 1900 पर्यंत मुंबईसह दक्षिण भागातील अनेक प्रांतात दुष्काळ पडला होता.
- एका अंदाजानुसार मुंबई प्रांतात सुमारे 4 लाख 62 हजार लोक मारले गेले होते.
- त्यावर्षी लॉर्ड कर्झन व्हाइसरॉय होते.

दुष्काळातही पुरवठा थांबवला...
- 1943 मध्ये दुसऱ्या वर्ल्ड वॉरदरम्यान बंगालमध्ये आलेला दुष्काळ आजवरचा सर्वात भीषण दुष्काळ मानला जातो. मात्र ही केवळ नैसर्गिक आपत्ती नव्हती तर मानवनिर्मित दुष्काळ होता.
- जपानने बर्मावर ताबा मिळवल्यानंत बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. जपानी आक्रमणांबाबतच्या अनिश्चिततेमुळे शहरी भागांमध्ये साठेबाजीमुळे महागाई वाढत चालली होती.
- तांदळाची कमतरता असल्याने दर आभाळाला पोहोचले होते. जपानच्या आक्रमणाच्या भितीने नाव जप्त केल्याने पुरवठाही थांबला होता.
- भारतात ब्रिटीश सरकारने देशातील इतर भागांतून दुष्काळग्रस्त भागाला धान्य देण्यासा बंदी केली होती.
- अनेक इतिहासकार या दुष्काळाला मानवनिर्मित नरसंहार दुष्काळ म्हणतात. यात सुमारे ३० लाख लोक ठार झाले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, भारतीय इतिहासातील काही भीषण दुष्काळाचे PHOTOS