आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबाच्या मुलाची क्लासमेट होती ही व्यक्ती, हनीप्रीतसाठी करायचा हे खास काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत- हरियाणा पोलिसांच्या एसआयटीने गुरुवारी गुरमीत राम रहीमचा निकटवर्तीय दिलावर इंसांला ताब्यात घेतले आहे. कोर्टाने त्याला सात दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवले आहे. दिलावर इंसा बाबाच्या अतिशय जवळची व्यक्ती होती. याच कारणामुळे दिलावर हनीप्रीतच्या चित्रपटांसाठी ऑडीशन घ्यायचे काम करत असे. 

वाचा बाबाचा निकटवर्तीय दिलावरची संपूर्ण हिस्ट्री...
- दिलावर मुळचा सोनीपतच्या एका लहानशा गावातून आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब डेरा सच्चा सौदामध्ये जात असे.
- दिलावरने डेरा सच्चा सौदामध्ये राहूनच आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. गुरमीत राम रहीमचा मुलगा जसमीतचा दिलावर वर्गमित्र होता.
 
निकटवर्तीय असल्याने बाबाने बनवले त्याला शाळेचा मुख्याध्यापक... 
- दिलावर इंसांवर बाबाची खूप कृपा होती. याच कारणामुळे ज्या शाळेत दिलावर शिकला होता. त्याच शाळेचा बाबाने त्याला मुख्याध्यापक केले होते.
- दिलावरचे संपूर्ण कुटुंब डेरा सच्चा सौदामध्ये वास्तव्याला होते.
 
बाबा मंचावर येताच करायचा स्तुतीसुमनांचा वर्षाव...
- दिलावर डेरात आयोजित होणा-या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करत असे. गुरमीत राम रहीमची मंचावर एन्ट्री होताच, दिलावर त्याच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करायचा.
- राम रहीम स्वतःचे कौतुक ऐकून अतिशय आनंदी होत असे. दिलावरलाच बाबा कार्यक्रमांच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी सोपवायचा. अल्पावधीतच दिलावर अतिशय प्रसिद्ध झाला होता. बाबाने त्याला मुख्याध्यापकासोबतच डेराचा प्रवक्ता बनवले होते.
 
चित्रपटांसाठी घ्यायचा ऑडिशन...
- दिलावर बाबा आणि हनीप्रीतच्या चित्रपटांसाठी ऑडिशन घ्यायचे काम करायचा. तो निवड समीतीचा सदस्य होता.
- डेरा प्रमुखच्या काही चित्रपटांमध्ये दिलावरने अभिनयसुद्धा केला होता.
- दिलावरची पत्नी शाह सतनाम ग्रीन एस वेलफेअर फोर्स विंगची सदस्य होती.
- दिलावर आणि हनीप्रीत यांच्यात अतिशय जवळचे संबंध असल्याची चर्चा आहे.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, संबंधित फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...