आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे भारतीय क्रिकेटर पतौडी यांचा \'पतौडी पॅलेस\', सैफ-करीनाही येथे घालवतात वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅलेसचा बाहेरील भाग. - Divya Marathi
पॅलेसचा बाहेरील भाग.
गुडगाव - भारताचे माजी क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांची आज (5 जानेवारी, 1941) जयंती. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवाब पतौडी यांचे नाव गौरवास्पद कामगिरीसाठी घेतले जाते. पतौडी यांच्या नेतृत्वाखाली 1967 मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्यांच्याच भूमीवर त्यांचा पराभव करत विदेशी भूमीवर सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. 1961 ते 1975 याकाळात त्यांनी भारतासाठी 46 कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी 40 कसोटीत त्यांनी भारताचे नेतृत्व केले. 46 कसोटी सामने खेळताना त्यांनी 2793 धावा केल्या. यांत 6 शतके आणि 16 अर्धशतकांचा समोवेश आहे. 203 धावा ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.
या प्रसंगी आम्ही आपल्याला माहिती देत आहोत, पतौडी पॅलेसच्या संदर्भात...
हरियाणामधील गुडगांव येथून 26 किलोमीटर दूर असलेल्‍या पतौडी येथे लखलखणारा हा महाल म्‍हणजे पतौडी परिवाराची निशाणी पतौडी पॅलेस आहे. 200 वर्षाहून मोठा इतिहास या परिवाराला लाभला आहे. पण हा महाल 80 वर्षापुर्वीचाच आहे. 8 वे नवाब आणि भारतीय टीमचे माजी कर्णधार इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी यांनी 1935 मध्‍ये हा महाल बांधला होता. त्‍यानंतर 9 वे नवाब मंसूर अली उर्फ नवाब पतौडी यांनी विदेशी आर्किटेक्‍टच्‍या मदतीने या महालाची आकर्षक डिझाइन केली. या नवाबाच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याची सुन आणि सैफ अली खान, पत्‍नी करीना आता हा महाल सांभाळत आहेत. सैफच्‍या या घरात मंगल पांडे, वीर-जारा आणि रंग दे बसंती सारख्‍या काही बॉलीवुड चित्रपटांची शुटिंगही झाली आहे. 1 नोव्‍हेंबर हा या प्रदेशाचा स्‍थापनादिन आहे.
काय आहे महालात
या महालात भलीमोठी ड्रॉइंग रूम व सात बेडरूम, ड्रेसिंग रूम आहेत. महालाचे डिझाइन एखाद्या राजवाड्यासारखे आहे. ऑस्‍टेलियाचे आर्किटेक्‍ट कार्ल मोल्‍ट हेंज यांच्‍या सहकार्यातून या महलाची डिझाइन करण्‍यात आली. आता अभिनेता सैफ अली खान हा 10 वा नवाब आहे.
पॅलेसमध्‍ये सैफीनासाठी आहे शेर महल
या महालात सैफीनासाठी शेर महल ही आठव्‍या नंबरची रूम आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्‍या लग्‍नापूर्वी शेर महल बांधण्‍यात आला होता. करीनाने या महालात 35 वा वाढदिवसही साजरा केला आहे.

करीनाने करून घेतले महालाचे नुतनीकरण
बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर खान हिला हा महाल खुप आवडतो. या महालात वेळ घालवले तिला पसंद आहे. काही दिवसांपूर्वीच शुटिंगमध्‍ये व्‍यस्‍त असलेल्‍या करीनाने वेळ काढून या महालाच्‍या दहा खोल्‍यांचे नुतनीकरण करून घेतले. तिची सासू शर्मिला टॅगोरही यावेळी सोबत होती.
पतौडी पॅलेसचा इतिहास
सलामत खान हे 1408 मध्‍ये अफगानिस्तानातून भारतात आले होते. सलामत यांचे नातू अल्फ खान यांनी मुघलांच्‍या लढाईमध्‍ये मदत केली. पुढे अल्फ खान यांना राजस्थान आणि दिल्लीमध्‍ये बक्षीस म्‍हणून जमिनी मिळाल्‍या.याच घराण्‍याचा पुढचा वंशज म्‍हणजे सैफ अली खान.
महलात आहेत कबर
मंसूर अली उर्फ नवाब पटौदी यांच्‍या मृत्‍यूनंतर महालाच्‍या परिसरात असलेल्‍या कब्रगाहमध्‍येच त्‍यांना पुरले होते. त्‍याच्‍या बाजुलाच त्‍यांचे आजी- आजोबा आणि वडिलांची कबर आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, काय काय आहे या वैशिष्‍ट्यपूर्ण महालात ..
बातम्या आणखी आहेत...