आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातेत भाजप नगरसेवकास झाडाला बांधून जमावाने केली मारहाण; पोलिसांनी केली सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडोदरा- गुजरातच्या वडोदरा येथे झाेपडपट्टी हटवल्याने संतप्त झालेल्या जमावाने भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हसमुख पटेल यांना झाडाला बांधून बेदम मारहाण केली. घटनास्थळी पोलिस आल्यामुळे त्यांची जमावाच्या तावडीतून कशीबशी सुटका झाली.  

याप्रकरणी ३० जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. वडोदरा शहराची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली आहे. याअंतर्गत सौंदर्यीकरण करण्याच्या योजनेत एक झोपडपट्टी हटवण्यात आली. येथील रहिवाशांना पर्यायी घरे देण्यात आली नव्हती. त्यामुळे लोकांत असंतोष पसरला होता.
  
शहरातील बापोद भागातील वॉर्ड क्रमांक ५ मधील भाजपचे नगरसेवक हसमुख पटेल यांनी सांगितले, सकाळी या परिसराची पाहणी करण्यास गेलो असता काही लोकांनी मला घेराव घातला. आमची घरे का तोडली, असा सवाल करून मला फरपटत नेऊन एका झाडाला बांधले. सुमारे १५० जणांच्या जमावाने मला मारहाण करण्यास सुरुवात केली. झोपडपट्टी हटवण्याचा निर्णय आयुक्तांचा होता. या निर्णयाशी माझा काही संबंध नसताना मला मारहाण झाली. मी हेच लोकांना सांगत असतानाही त्यांनी मारहाण सुरूच ठेवली होती. घटनास्थळी पोलिस दाखल झाले व त्यांनी माझी सुटका केली.
बातम्या आणखी आहेत...