आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एचआयव्ही पाॅझिटिव्हशी लग्नाची यशस्वी चार वर्षे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर - एड्सग्रस्त युवतीशी लग्न हा धाडसी निर्णय आहे. रजतने (बदललेले नाव) चार वर्षांपूर्वी एड्सग्रस्त युवतीशी लग्न केले. मात्र, अद्याप घरच्यांना कळू दिले नाही. चार वर्षांच्या सुखी संसारानंतर रजतने मुलगीही दत्तक घेतली. रजत म्हणतो, २००९मध्ये जालंधरला आलो. त्याआधी सहा वर्षे दिल्लीत एड्सवर काम करणार्‍या संस्थेत होतो. समाजाने या लोकांना स्वीकारल्यास त्यांच्यासोबत आयुष्य घालवणे शक्य आहे, असे तेव्हा वाटले.

शनिवारी लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करणार्‍या रजतची ६ वर्षांपूर्वी गीतशी (बदललेले नाव) भेट झाली. रजतच्या बहिणीच्या शेजारी ती राहायची. ती घटस्फोटीत व एचआयव्हीग्रस्त असल्याचे बहिणीने सांगितले होते. गीत मला टाळत होती. तिला एड्स असल्याचे माहिती असल्याची जाणीव तिला मी वर्षभर हाेऊ दिली नाही. दीड वर्षांनी मी गीतसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सुरुवातील तिने नकार दिला होता.
बातम्या आणखी आहेत...