आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hizbul Terrorists Disguise As Army Men Uploads Video

VIDEO - J&K: ओळख लपवणारे दहशतवादी का देताहेत ओळख ? पाहा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चॅटिंग करताना दहशवादी - Divya Marathi
चॅटिंग करताना दहशवादी
श्रीनगर (जम्मू-कश्मीर) – दहशवादी संघटना असलेल्‍या हिज्‍बुल मुजाहिदीनने आपल्‍या सदस्‍यांचा एक व्‍हीडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. यामध्‍ये दहशवादी एकमेकांना विनोद सांगताना तर काही स्‍मार्ट फोनवरून चॅटिंग करताना दिसत आहेत. यापूर्वीसुद्धा या संघटनेकडून फोटो अपलोड करण्‍यात आले होते. जम्मू-कश्मीरमधील युवावर्गाला आकर्षित करण्‍यासाठी या संघटनेकडून वारंवार व्‍हीडिओ, फोटो अपलोड केले जात असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.
नेमके काय आहे व्‍हीडिओमध्‍ये
यामध्‍ये असलेले दहशवादी त्‍यांच्‍या संघटनेचा गणवेश आणि शस्‍त्रासह दिसत आहेत. शिवाय सर्वांचे चेहरे स्‍पष्‍ट ओळखू येतात. शोपियां आणि कुलगाव जवळ असलेल्‍या एका बागेत हे सर्व निवांत बसलेले दिसतात. यातील काही जण आपली बंदूक लोड करत आहेत तर काही विनोद सांगत आहेत. एखाद – दुस-याचे लक्ष स्‍मार्ट फोनमध्‍ये चॅटिंग करण्‍यात आहे. या व्‍हीडिओमधील धक्‍कादायक बाब म्‍हणजे जम्मू-कश्मीर पोलिस दलातील माजी कॉन्स्टेबल असलेला नसीरसुद्धा यात दिसत आहे. जो की एका मंत्र्याचा सुरक्षा गार्ड असताना एके-47 राइफल्स घेऊन पळून गेला. त्‍याच्‍याशिवाय बुरहान वानी नावाचाही एक युवकसुद्धा स्‍पष्‍ट दिसत आहे.
नेमका उद्देश काय?
दहशवादी सहसा आपली ओळख सांगत नाहीत. पण, वारंवार फोटो आणि व्‍हीडिओ टाकून तो भारतीय सुरक्षा दलाला आव्‍हान देत आहेत. यातून त्‍यांचा आत्‍मविश्‍वास कमी व्‍हावा, असाही या मागे हेतू असू शकतो, असा अंदाज आहे. दुसरे म्‍हणजे यातून युवकांना आपल्‍याकडे आकर्षिक करण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न आहे. सुरक्षा दलाने नुकतेच दहशतवाद्यांच्‍या विरोधात अभियान सुरू केले. त्‍या अंतर्गत आयपी अॅड्रेसेज शोधण्‍याचा प्रयत्‍न केला गेला. पण, दहशवादी मास्क्ड आयपी वापरत असल्‍याने यात अपयश आले.