आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Actor Tom Cruise Stats For Mission Impossible 5

PIX : \'मिशन इम्‍पॉसिबल-5\' साठी 5000 फुट उंचीवर विमानाला लटकला टॉम क्रूज!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: शूटिंग दरम्‍यान सर्वांत खतरनाक स्‍टंट करताना टॉम क्रूज
लंडन: प्रसिध्‍द हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज याने आगामी 'मिशन इम्‍पॉसिबल-5' या‍ चित्रपटासाठी सर्वांत खतरनाक स्‍टंट दिला आहे. मानले जाते की यापूर्वी असा स्‍टंट्स कोणत्‍याच अभिनेत्‍याने दिला नाही.
52 वर्षीय क्रूजने हा अॅक्‍शन सीन स्‍वत: केला आहे. 5000 फुट उंचीवरुन उडणा-या विमानाच्‍या गेटला लटकून त्‍याने हा स्‍टंट्ट केला आहे.

'मिशन इम्‍पॉसिबल-5' या चित्रपटाचे चित्रिकरण ब्रिटनमधील ग्रामीण भागामध्‍ये होत आहे. टॉम ज्‍या विमानाला लटकला ते विमान 4 इंजिनचे असून A400M एयरबस आहे. टॉम क्रूज विमानाच्‍या गेटला लटकलेला आहे. सुरक्षेसाठी त्‍याने सेफ्टी बेल्‍टचा वापरही केला होता. 'मिशन इम्‍पॉसिबल-5' हा चित्रपट 2015 मध्‍ये प्रदर्शित होणार आहे.
मिशन इम्‍पॉसिबल या सिरीजच्‍या चित्रपटात टॉम क्रूज इथन हंट नावाच्‍या गुप्‍तहेराची भूमिका निभावत आहे. टॉम क्रूजच्‍या 'नाइट अँड डे' या चित्रपटावर आधारीत भारतामध्‍ये 'बँग-बँग' हा चित्रपट बनविल्‍या गेला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शूटिंग दरम्‍यानची छायाचित्रे..