आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक बेघराला घर,‘बीपीएल’ची अट नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - दारिद्रय़ रेषेखालील (बीपीएल) बेघरांना निवासाची सोय व्हावी म्हणून केंद्र सरकारच्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत दिली जाणारी घरे आता बीपीएल यादीत नाव नसलेल्या बेघरांनाही मिळू शकतील. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. 1 एप्रिल 2014 पासून नवी योजना लागू होत आहे.

देशात कोट्यवधी लोक बेघर आहेत. यापैकी ज्यांची नावे बीपीएल यादीत आहेत ते घरांसाठी अर्ज करू शकतात. योजनेची व्याप्ती वाढवून आता प्रत्येक बेघराला या योजनेअंतर्गत हक्क सांगता येईल.

बिहारसाठी 4133 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेजही रमेश यांनी जाहीर केले. भाजपशी काडीमोडानंतर जदयूशी कॉँग्रेसच्या जवळिकीचा हा परिणाम मानला जात आहे.