आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Minister Rajnath Met VHP Leader Ashok Singhal

विहिंप नेते सिंघल ICU मध्ये, म्हणाले मी ठीक, अजून राम मंदिर बनवायचेय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉस्पिटलमध्ये सिंघल यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले प्रवीण तोगडीया. - Divya Marathi
हॉस्पिटलमध्ये सिंघल यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले प्रवीण तोगडीया.
गुडगाव - विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) चे संरक्षक अशोक सिंघल यांच्यावर गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र रविवारी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह आणि प्रवीण तोगडियासारखे नेते त्यांना भेटण्यासाठी पोहोचले. त्यादरम्यान सिंघल म्हणाले की, मी आता ठिक आहे. मला काहीही झालेले नाही. अजून तर अयोध्येत भव्य राममंदिर बनवायचे आहे. 89 वर्षीय सिंघल गेली अनेक दशके राम जन्मभूमी आंदोलनाशी संलग्न आहेत.

चर्चांना उधाण
डॉक्टरांनी सांगितले की, रविवारी सकाळी त्यांनी डोळे उघडले. तब्येत सुधारल्याने डॉक्टरांनी त्यांना काही लोकांना भेटण्याची परवानगी दिली. त्यापूर्वी शनिवारी भाजपाध्यक्ष अमित शाह, आरोग्यमंत्री जेपी नड्डा, यांनाही रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली. गेलस्या काही तासांत सोशल मिडियावर याबाबत विविध चर्चा उठल्या आहेत.

हॉस्पिटलमध्ये का दाखल केले...
> व्हिएचपीने दिलेल्या माहितीनुसार, सिंघल यांना गेल्या एका महिन्यापेक्षा अधिक काळापासून श्वासाशी निगडीत समस्या आहेत.
> अलाहाबादमध्ये त्यांच्यावर उपचार होत होता. पण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती.
> 20 ऑक्टोबरला प्रकृती खराब झाल्याने त्यांना विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली होती.
> या आठवड्यात त्यांनी तब्येत पुन्हा खालावली. त्यामुळे शुक्रवारी त्यांना मेदांतामध्ये दाखल कराने लागले. त्यांना बेशुद्धावस्तेत आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.