आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिम हे राष्ट्रवादीच, दहशतवाद झुगारल्याबद्दल आभार, राजनाथ यांची कृतज्ञता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - देशातील मुस्लिम हे प्रखर राष्ट्रवादी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यावर ते रविवारी लखनऊत दाखल झाले. आपण अतिरेकी संघटना आयएससाेबत नसल्याचे देशातील मुस्लिमांनी दाखवून दिल्याचे राजनाथ म्हणाले. त्यासाठी त्यांनी सर्व मुस्लिमांचे आभारही व्यक्त केले.

राजनाथ म्हणाले, इराक आणि सिरियात उत्पात माजवणाऱ्या आयएसअायएसला भारतीय सीमेपर्यंत पोहोचण्यापासून कोणत्याही परिस्थितीत रोखले जाईल. पाकिस्तानने दहशतवादाच्या मुद्द्यावर भारतासोबत सहकार्य केले नाही तर तेथेही दहशतवाद अाणखी मोठ्या प्रमाणात पसरेल, असा इशाराही त्यांनी दिला. बनावट नोटा या देशासाठी मोठा धोका असल्याचे ते म्हणाले.

भारतातील काही तरुणांनी आयएसआयएसशी जुळण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कुटुंबीयांनीच त्यांना रोखून माघारी परतण्यास भाग पाडले. मुस्लिम कधीच अतिरेक्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांना सल्ला देत राजनाथ म्हणाले, दहशतवाद कोण पसरवतोय हे अवघ्या जगभराला चांगलेच ठावूक आहे. शनिवारी अझीज यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. पर्रीकर यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसले की भारतच पाकमध्ये दहशतवाद पसरवतोय,असे अझीझ म्हणाले होते.
बातम्या आणखी आहेत...