आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Minister Rajnath Singh Begins Three Day Tour Of Border Areas

J&K: राजनाथ सीमा दौऱ्यावर, म्हणाले- चीनला मोदींनी स्पष्ट इशारा दिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घगवालस्थित भारत-तिबेटीयन सीमा पोलिस दलाच्या ४७ व्या तुकडी केंद्राची सलामी घेताना राजनाथसिंह - Divya Marathi
घगवालस्थित भारत-तिबेटीयन सीमा पोलिस दलाच्या ४७ व्या तुकडी केंद्राची सलामी घेताना राजनाथसिंह
श्रीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला स्पष्ट इशारा दिला आहे, की दोन्ही देशांमधील संबंध सुधारायचे असतील तर सीमेसह सर्व वादग्रस्त मुद्दे निकाली निघाले पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले. गृहमंत्री सोमवारपासून तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या भारतीय सीमेच्या सुरक्षेचा ते आढावा घेणार आहेत.
सोमवारी सकाळी त्यांनी सांबा सेक्टर येथील आयटीबीपी (भारत-तिबेटीयन सीमा पोलिस दल) कँपच्या नव्या इमारतीचे उदघाटन केले. इंडो-चीन बॉर्डरवर 3488 किलोमीटर लांबीच्या सीमेचे आयटीबीपी जवान संरक्षण करतात.

काय म्हणाले, राजनाथसिंह
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले, भारताला सर्व शेजारी देशांसोबत शांतता हवी आहे.
- भारत-चीन सीमेवर रस्ते आणि टेलिफोन कनेक्टीव्हीटीचा प्रश्न आहे. त्यासाठीच सरकार नवा रस्ते मार्ग तयार करत आहे. यामुळे दळणवळण सोपे होईल.
- ITBP चे जवान ज्या भागात तैनात आहेत तिथील वातावरण अतिशय कठीण आहे.
- तुम्ही हिमवीरच नाही तर हिमालयपूत्र आहात.
- गेल्यावर्षी हेरातमधील दुतावासावर हल्ला झाला तेव्हा आयटीबीपी जवानांनी यशस्वी मोर्चा सांभाळला होता. भारतातच नाही तर शेजारी देश अफगाणिस्तानातही हे जवान आपली जबाबदारी योग्य पार पाडत आहेत.

पुढील कार्यक्रम काय
सांबा सेक्टरन नंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह चुमार (लद्दाख) येथे जातील. 2014 मध्ये भारत आणि चीन दरम्यान येथेच झडप उडाली होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, राजनाथ यांचा दौरा