आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारने प्रथमच स्पष्ट केली राम मंदिराच्या निर्मितीबाबतचा नाइलाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : राम जन्मभूमी आंदोलनातील संतांबरोबर राजनाथ सिंह. - Divya Marathi
फाइल फोटो : राम जन्मभूमी आंदोलनातील संतांबरोबर राजनाथ सिंह.
फैजाबाद (उत्तर प्रदेश) - अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीबाबतचे कारण मोदी सरकारच्या वतीने प्रथमच सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीबाबत सरकारचा नाइलाज स्पष्ट करताना म्हटले की, हायकोर्टाचा निर्णय आला आहे. मला वाटते तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहायला हवी. त्यासाठी आवश्यक असलेला कायदा बनवण्यासाठी राज्यसभेत बहुमत नाही. फैजाबाद येथे दीनबंधू नेत्र रुग्णालयाच्या पायाभरणी कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर सह सरकार्यवाहक गोपाल किशनही उपस्थित होते.

राजनाथ शनिवारपासूनच लखनऊमध्ये आहेत. रविवारी दुपारपर्यंत ते हेलिकॉप्टरने आधी अयोध्येला गेला. त्याठिकाणाहून ते फैजापूरला रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

वाद मिटवण्याचे दोन मार्ग
अयोध्येतील राम जन्मभूमीशी संबंधित वाद मिटवण्यासाठी दोनच मार्ग शिल्लक आहेत. त्यापैकी एक मार्ग म्हणजे न्यायालयाच्या माध्यमातून याचा निर्णय व्हावा आणि दुसरा मार्ग म्हणजे संसदेत याच्याशी संबंधित कायदा तयार करणे.

संयुक्त अधिवेशनाच्या पर्यायाचा विसर
केंद्र सरकारची अनेक विधेयके राज्यसभेत अडकणार अशी शक्यता दिसत आहे. त्यात भूसंपादन विधेयक सर्वात महत्त्वाचे अाहे. विरोधक विधेयकाच्या सध्याच्या मसुद्यावर हे विधेयक मंजूर होऊ देण्यास तयार नाहीत. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार अखेरीत संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवून हे विधेयक मंजूर करून घेईल.